स्टेट बँक ऑफ इंडिया भरती नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025 | State Bank Of India Recruitment 2025

State Bank Of India Recruitment 2025: बँकिंग क्षेत्रात करियर घडवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी सुवर्ण संधी चालून आलेली आहे. भारतातील इच्छुक बँकर्ससाठी एक महत्त्वाची जाहिरात आहे. मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजर पदासाठी  04 रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोंठ्या बँकांपैकी एक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया मधील करिअर हे केवळ नोकरी नाही तर ती प्रतिष्ठेची आणि सुरक्षतेची बाब असल्याने, ही भरती मोहीम सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग उद्योगात स्थिर आणि फायदेशीर कारकीर्द मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. (State Bank Of India Recruitment 2025) अर्ज करण्यासाठी दिनांक 15 सप्टेंबर 2025 या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

State Bank Of India Recruitment 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत :  ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : 04 पदे
  • पदाचे नाव : मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजर
पद क्रं. पदाचे नाव  पद संख्या 
1. मॅनेजर 02
2. डेप्युटी मॅनेजर 02
TOTAL  04

शैक्षणिक पात्रता:
मॅनेजर-पदव्युत्तर पदवी/पदविका/संबंधित क्षेत्रात डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण असावे.  व्यवस्थापकीय भूमिकेत किमान 05 वर्ष अनुभव असणे आवश्यक.
डेप्युटी मॅनेजर – पदव्युत्तर पदवी/पदविका/मार्केटिंग मॅनेजमेंटमधील कार्यक्रम किंवा समतुल्य संबंधित क्षेत्रात डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण असावे.  व्यवस्थापकीय भूमिकेत किमान 02 वर्ष अनुभव असणे आवश्यक.
वरील दोन्ही पदांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

State Bank Of India Recruitment 2025

महत्त्वाच्या तारखा :

  1. जाहिरात प्रकाशित : 25 ऑगस्ट 2025
  2. ऑनलाइन अर्ज सुरूः 25 ऑगस्ट 2025 पासून
  3. अर्जाची शेवटची तारीखः  25 सप्टेंबर 2025 पर्यंत संध्याकाळी 5:00 पर्यंत
  4. शुल्क भरण्याची शेवटची तारीख (ऑनलाइन): 15 सप्टेंबर 2025 पर्यंत
  • भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • भरती प्रकार : बँकिंग क्षेत्रात कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळविण्याची संधी.
  • भरती श्रेणी : गट – अश्रेणीतील पदभरती

(अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

  • वयोमर्यादा (Age Limit): 25 ऑगस्ट 2025 रोजी,  25 ते 45 वर्षा दरम्यान असावे. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्ष सूट ]
  • अर्ज शुल्क (Fee) : General/OBC/EWS: 750/- रुपये  [SC/ST/PWD/Woman अर्ज शुल्क माफ राहील.]
  • मासिक वेतन (Salary ) : दरमहा 64,820 ते 1,05280 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
  • नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

State Bank Of India Recruitment 2025

निवड प्रक्रिया (Selection Process) :

  • निवड प्रक्रिया: निवड हे दोन पद्धतीने होईल सर्वप्रथम शॉर्टलिस्टिंग आणि  त्यानंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.
  • शॉर्टलिस्टिंग: केवळ पात्रता आणि अनुभव पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्याचा अधिकार राहणार नाही. तर बँकेने स्थापन केलेली शॉर्टलिस्टिंग समितीमधील शॉर्टलिस्टिंग पॅरामीटर्स ठरवेल आणि त्यानंतर, बँकेने ठरवल्याप्रमाणे पात्र संख्येच्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.
  • मुलाखतीसाठी: उमेदवारांना बोलवण्याचा अधिकार अंतिम निर्णय बँकेचा राहील.या संदर्भात कोणताही कागोदपत्री पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
  • मुलाखत:  मुलाखती 100 गुणांवर आधारित असेल. मुलाखतीतील पात्रता गुण ठरवण्याचा अधिकार बँकेकडे असेल. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार करला जाणार नाही.
  • गुणवत्ता यादी: निवडीसाठी गुणवत्ता यादी श्रेणीनुसार केवळ मुलाखतीत मिळालेल्या गुणांवर आधारित उतरत्या क्रमाने तयार करण्यात येईल. जर एकापेक्षा अधिग उमेदवारांनी कट-ऑफ गुण मिळवले (कट-ऑफ पॉइंटवर समान गुण), अशा उमेदवारांना त्यांच्या वयानुसार उतरत्या क्रमाने क्रमांक देण्यात येईल.

ऑनाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 25 सप्टेंबर 2025 पर्यंत

अधिकृत संकेतस्थळ  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज येथे येथे क्लिक करा 

State Bank Of India Recruitment 2025

⚠️उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना:

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाकडे (State Bank Of India Recruitment 2025) अंतिम निर्णय असेल.
  • अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
    कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
आर आर सी दक्षिण रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध | RRC SR Apprentice Recruitment 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा

1 thought on “स्टेट बँक ऑफ इंडिया भरती नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025 | State Bank Of India Recruitment 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo