स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) दिल्ली पोलीस दलात 7565 पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध | SSC Delhi Police Constable Recruitment 2025

SSC Delhi Police Constable Recruitment 2025:पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने एसएससी दिल्ली पोलिस कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह भरती 2025 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवारांसाठी 7565 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ही भरती स्थिर आणि सन्मानाची नोकरी शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी हि एक सुवर्णसंधी आहे. यामध्ये वेतन पातळी-3 मध्ये एक उत्कृष्ट पगार पॅकेज देखील प्रदान करते, ज्यामध्ये अनेक फायदे आहेत. तुम्ही जर बारावी उत्तीर्ण असाल तर या भरतीसाठी पात्र आहात, अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 ऑक्टोंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला असून, उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आलेली आहे ते वाचावी!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

SSC Delhi Police Constable Recruitment 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : 7565 पदे
  • पदाचे नाव : कॉन्स्टेबल (Executive) पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
    शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळातून 12वी उत्तीर्ण (पुरुष उमेदवारांसाठी मोटरसायकल LMV लायसन्स अनिवार्य)

पदांचा तपशील

पद क्रं. पदाचे नाव पद संख्या
1. कॉन्स्टेबल(Executive)पुरुष 4408
2. कॉन्स्टेबल (Executive)पुरुष (Ex-Servicemen & Others) 0285
3. कॉन्स्टेबल(Executive)पुरुष (Ex-Servicemen–Commando) 0376
4. कॉन्स्टेबल(Executive)महिला 2496
एकुण 7565
  • भरती विभाग : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात आहे.
  • नोकरीचा प्रकार : दिल्ली पोलीस दलात कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : दिल्ली (India)

महत्त्वाच्या तारखा 

ऑनलाइन अर्ज सुरू 22 सप्टेंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 21 ऑक्टोंबर 2025 पर्यंत
परिक्षा शुल्क अंतिम तारीख 22 ऑक्टोंबर 2025 रात्री 23:00 पर्यंत
अर्ज दुरुस्ती 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2025
लेखी परीक्षा/मैदान चाचणी डिसेंबर 2025/जानेवारी 2026

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) दिल्ली पोलीसच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा ऑनलाईन लेखी परीक्षा (CBT)
दुसरा टप्पा मैदानी चाचणी (Physical Test)
तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
चौथा टप्पा वैद्यकीय तपासणी
  • मासिक वेतन (Salary) : बेसिक 21,700 ते 69,100/- रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 1 जुलै 2025 रोजी
    सर्वसाधारण उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे. (दिल्ली पोलीस पाल्य वयोमर्यादा कमाल 29 वर्षे राहील)
    [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, खेळाडू – 10 वर्ष सूट ]

अर्ज शुल्क

General / OBC / EWS 100/- रुपये
SC / ST / Women/ Ex-Servicemen अर्ज शुल्क नाही

SSC Delhi Police Constable Recruitment 2025

अर्ज करण्याची पद्धत
  1. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या (SSC)अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  2. जर तुम्ही नवीन वापरकर्ता असाल, तर तुम्हाला ‘वन-टाइम रजिस्ट्रेशन (OTR)’ प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यामुळे तुमचे लॉगिन क्रेडेन्शियल्स तयार होतील.
  3. तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
  4. ‘लाईव्ह एक्झामिनेशन’ विभागाअंतर्गत SSC Dilhi Police Recruitment 2025 मध्ये कॉन्स्टेबल (Exicutive) पुरुष आणि महिला’ साठी ‘अर्ज करा’ लिंक शोधा.
  5. अचूक तपशीलांसह अर्ज फॉर्म भरा. तुमची मूलभूत माहिती तुमच्या OTR Profile मधून स्वयंचलितपणे भरली जाईल.
  6. अर्ज मॉड्यूल तुम्हाला तुमच्या वेबकॅम किंवा स्मार्टफोनचा वापर करून लाईव्ह फोटो काढण्यास सांगेल. ते स्पष्ट आणि साध्या पार्श्वभूमीवर असल्याची खात्री करा.
  7. तुमच्या स्वाक्षरीची स्कॅन केलेली प्रत निर्दिष्ट स्वरूपात अपलोड करा.
  8. उपलब्ध पेमेंट गेटवेद्वारे ऑनलाइन अर्ज शुल्क भरा.
  9. अंतिम सबमिशन करण्यापूर्वी तुमच्या अर्जाची काळजीपूर्वक पुनरावलोकन करा.
  10. भविष्यातील संदर्भासाठी तुमच्या सबमिट केलेल्या अर्जाची एक प्रत डाउनलोड करा आणि प्रिंट करा. संदर्भासाठी तुमच्या सबमिट केलेल्या अर्जाची एक प्रत डाउनलोड करा आणि प्रिंट करा.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 21 ऑक्टोंबर 2025 रात्री 23:00 वाजेपर्यंत

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील  लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

SSC Delhi Police Constable Recruitment 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • लेखी परिक्षा आणि मैदानी चाचणीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मनात घेतली जाणार नाही.
  • उमेदवारांच्या  भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही उमेदवाराची उमेदवारी नाकारण्याचा अधिकार स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) दिल्ली पोलीसने राखून ठेवला आहे, जर अपात्र असल्याचे आढळले किंवा चुकीची  माहिती/प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर केली किंवा कोणतीही ‘भौतिक तथ्ये’ लपवली असतील, आणि अपात्र उमेदवारांनी भरलेले शुल्क जप्त केले जाईल.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.

हि जाहिरात पण पहा 👇
💁‍♂️एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 7,267 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया | Eklavya Model Nivasi Shala Bharti 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

1 thought on “स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) दिल्ली पोलीस दलात 7565 पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध | SSC Delhi Police Constable Recruitment 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo