SSB Constable Bharti 2026SSB Constable Bharti 2026: जर तुम्ही केंद्रीय निमलष्करी दलामध्ये (Central Paramilitary Force) संरक्षण क्षेत्रातील नोकऱ्यांच्या शोधात असाल, तर ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. कारण केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘सशस्त्र सीमा बल’ (SSB) ने चालक (Driver), पशुवैद्यकीय (Veterinary), शिंपी (Tailor), न्हावी (Barber), धोबी (Washerman) आणि इतर अशा एकूण ११ वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये (Trades) 10 वी उत्तीर्ण किंवा ITI उमेदवारांसाठी ‘कॉन्स्टेबल (ट्रेड्समन)’ पदांच्या ८२७ जागांसाठी भरती जाहीर केली आहे अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.
SSB Constable Bharti 2026
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 827 पदे
- पदाचे नाव : कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी 10वी किंवा ITI उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज सादर करू शकतात.
पदांचा तपशील
| पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | कॉन्स्टेबल (वाहनचालक) | 553 |
| 2. | कॉन्स्टेबल (धोबी) | 74 |
| 3. | कॉन्स्टेबल (न्हावी) | 43 |
| 4. | कॉन्स्टेबल (शिंपी) | 41 |
| 5. | कॉन्स्टेबल (माळी | 41 |
| 6. | कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय) | 34 |
| 7. | कॉन्स्टेबल (चांभार) | 25 |
| 8. | कॉन्स्टेबल (सुतार) | 07 |
| 9. | कॉन्स्टेबल (पाणी वाहक) | 05 |
| 10. | कॉन्स्टेबल (वेटर) | 03 |
| 11. | कॉन्स्टेबल (परिचर्या सेवक) | 01 |
| एकूण | 827 |
- भरती विभाग : सशस्त्र सीमा बल अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- भरती प्रकार : सैन्य दलात कायमस्वरुपी नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
- नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत (SSB सीमा चौक्या)
महत्त्वाच्या तारखा
| अर्ज सुरू | 21 ते 27 मार्च 2026 पासून |
| शेवटची तारीख | प्रकाशनापासून ३० दिवस (अंदाजे एप्रिल २०२६) |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि सशस्त्र सीमा बलच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) आणि (PST) |
| दुसरा टप्पा | लेखी परीक्षा |
| तिसरा टप्पा | कागदपत्र व कौशल्य चाचणी |
| चौथा टप्पा | वैद्यकीय तपासणी |
- मासिक वेतन (Salary) : बेसिक 21,700 ते 69,100₹ पर्यंत मिळणार आहे.
- वयोमर्यादा (Age Limit) : पात्रता धारक उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे व कमाल वयोमर्यादा 23 वर्षे देण्यात आलेली आहे.
- [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट,]
अर्ज शुल्क
| श्रेणी | शुल्क |
| General / EWS / OBC | 100/- रुपये |
| SC/ST/माजी सैनिक/महिला | अर्ज शुल्क नाही |
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
SSB Constable Bharti 2026
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये SSB चा (SSB Constable Bharti 2026) निर्णय अंतिम असेल.
- अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
ही जाहिरात सुद्धा पहा 👇
Indian Navy Agniveer MR Bharti 2026 | 10 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-परिवारांना देखील शेअर करा