Solapur Mahanagar Palika Bharti 2025 : सोलापूर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान National Health Mission (NHM), अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग विभाग 15 वा वित्त आयोग हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत करारतत्वावर ठोक मानधनावर रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांची निवड करणेकामी सोलापूर महानगर पालिकेने जाहिरात प्रसिद्ध केली आहे इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी कळविण्यात येत आहे. या जाहिरातीमध्ये जवळपास 16 वेगवेगळ्या पदांसाठी 074 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आणि वेगवेगळ्या पदासाठी पदानुसार पात्रता मागवण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी जाहिरातीत पदापुढे नमूद केलेली शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी (Solapur Mahanagar Palika Bharti 2025) जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी. या भरती मध्ये निवड पद्धत ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे. सविस्तर माहिती खालील अधिकृत संकेतस्थळ वरती देण्यात आली आहे.
Solapur Mahanagar Palika Bharti 2025
अर्ज स्विकारण्याची पद्धत : थेट मुलाखतीस बोलवण्यात आले आहे.
एकूण पदसंख्या : 074 पदे
पदाचे नाव : वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेले आहेत.
भरती श्रेणी : सरळसेवे मार्फत सरकारी नोकरी मिळण्याची संधी
नोकरीचा प्रकार : करार तत्वावरती नोकरी
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता हे प्रत्येक पदांनुसार वेगवेगळी आहे त्यामुळे सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
जागांचा तपशील:
| पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | वैद्यकीय अधिकारी, पूर्णवेळ (UPHC/maternity/home/SNC U/NRC) | 10 |
| 2. | स्त्री रोग व प्रसुती तज्ञ (UCHC) | 03 |
| 3. | बालरोग तज्ञ (UCHC/SNCU) | 02 |
| 4. | सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ (एम.डी.) | 01 |
| 5. | स्त्री रोग व प्रसुतीतज्ञ- वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ (UPHC) | 05 |
| 6. | बालरोगतज्ञ- वैद्यकीय अधिकारी अर्धवेळb(UPHC) | 07 |
| 7. | फिजिशियन (general medicine) | 01 |
| 8. | वैद्यकीय अधिकारी (UHWC) | 01 |
| 9. | रेडिओलॉजिस्ट (Radiologist) | 01 |
| 10. | बालरोग तज्ञ (polyclinic) विजिट तत्वावर | 06 |
| 11. | श्री रोग तज्ञ (polyclinic) विजिट तत्वावर | 06 |
| 12. | फिजिशियन (polyclinic) विजिट तत्वावर | 05 |
| 13. | कान, नाक व घसातज्ञ (polyclinic) व्हिजिट तत्वावर | 05 |
| 14. | नेत्ररोग तज्ञ (polyclinic) व्हिजिट तत्वावर | 06 |
| 15. | त्वचारोग तज्ञ (polyclinic) व्हिजिट तत्वावर | 06 |
| 16. | मानसोपचार तज्ञ (polyclinic) व्हिजिट तत्वावर | 06 |
| TOTAL | 074 |
Solapur Mahanagar Palika Bharti 2025
मुलाखतीसाठी वेळ, तारीख व ठिकाण:
- मुलाखतीस उपस्थित राहण्याचा दिनांक: 28 ऑगस्ट 2025 रोजी.
- मुलाखतीस उपस्थित राहण्याचा पत्ता: सोलापूर महानगरपालिका स्थायी समिती सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वे लाईन्स, सोलापूर-413001
- मुलाखतीस कार्यालयीन वेळेत : सकाळी 11:00 ते सायंकाळी 4:00 वाजेपर्यंत उपस्थित रहावे.
वयोमर्यादा: वयोमर्यादेचा सर्व तपशील सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे
अर्ज शुल्क: शुल्क नाही
निवड प्रक्रिया: थेट मुलाखत
नोकरीचे ठिकाण: सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्र (महाराष्ट्र)
वेतनमान (Pay Scale) : अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
(अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| जाहिरात pdf पहा | येथे क्लिक करा |
| अर्ज नमुना येथे | येथे क्लिक करा |
Solapur Mahanagar Palika Bharti 2025
उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना:
- मुलाखतीस दिलेल्या दिनांकास व वेळेत उमेदवारांनी उपस्थित राहणे गरजेचे उशिरा आलेल्या उमेदवारास मुलाखतीस बसू दिले जाणार नाही.
- अर्जामध्ये दिलेले सर्व तपशील व्यवस्थित भरणे व अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- मुलाखतीस उपस्थित राहतेवेळी आवश्यक सर्व शैक्षणिक, अनुभव, जात इ. दाखले, प्रमाणपत्राच्या स्वयंसाक्षांकित सुस्पष्ठ छायांकित प्रती जोडाव्यात.
- अपूर्ण माहिती भरलेले व आवश्यक कागदपत्रे नसलेले अर्ज ग्राहय धरले जाणार नाहीत.
- उमेदवारांस मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यास मराठी लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
- राखीव प्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध न झाल्यास इतर प्रवर्गातील उमेदवारांना तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देण्यात येईल, त्यामुळे सर्व प्रवर्गातील पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत.
- दिलेल्या कालावधीत व दिनांकास उमेदवारांनी मुलाखती उपस्थित रहावे.
- अधिक माहिती https://www.solapurcorporation.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
हि जाहिरात पण पहा 👇
RRB सेक्शन कंट्रोलर भरती जाहिरात प्रसिद्ध 2025 | RRB Section Controller Bharti 2025
हि जायला तुमचे नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा
1 thought on “थेट मुलाखत | सोलापूर महानगरपालिका नवीन जाहिरात प्रसिद्ध : Solapur Mahanagar Palika Bharti 2025”