RRC NR Apprentice Bharti 2025: रेल्वे विभागात करिअर घडवण्यासाठी इच्छुक आहात का? कारण RRC उत्तर उत्तर रेल्वे विभागाने अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार)पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, या मध्ये दहावी/बारावी/आयटीआय पात्रता धारक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी मिळाली आहे. या भरती विविध ट्रेडमध्ये एकूण 4116 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे, जर तुम्ही भारतीय रेल्वेसोबत काम करण्याचे स्वप्न बघितले असेल तर या संधीचा नक्कीच फायदा करून घ्या. हि भरती केवळ प्रशिक्षण नाही तर यामध्ये तुम्हाला मासिक पगार देखील देण्यात येणार असून, या भरतीचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून त्याचा अंतिम दिनांक 24 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आलेली आहे ती वाचावी!
RRC NR Apprentice Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 4116 पदे
पदाचे नाव : अप्रेंटिस शिकाऊ उमेदवार (मूळ जाहिरात वाचा) - शैक्षणिक पात्रता : आवश्यक: उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून किमान 50% गुणांसह एसएससी/मॅट्रिक्युलेशन/10 वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) उत्तीर्ण केलेली असावी.
तांत्रिक: भारत सरकारने मान्यताप्राप्त एनसीव्हीटी/एससीव्हीटी द्वारे जारी केलेले संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
पदांचा तपशील
| क्लस्टरचे नाव | विभाग/युनिट | रिक्त जागा |
| लखनौ (LKO) | LKO विभाग, C&W AMV, CB/LKO, रोलिंग स्टॉक कार्यशाळा | 1397 |
| दिल्ली (DLI) | DLI विभाग, ब्रिज कार्यशाळा, C&W NZM, इलेक्ट्रिक लोको शेड | 1137 |
| फिरोजपूर (FZR) | FZR विभाग, C&W FZR, DSL शेड LDH, DMU कार शेड | 632 |
| अंबाला (UMB) | UMB विभाग, JUDW, C&W POH W/S जगधरी | 934 |
| मुरादाबाद (MBD) | MBD विभाग | 016 |
| एकुण | 4116 |
- भरती विभाग : RRC उत्तर पश्चिम रेल्वे विभागा अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- भरती श्रेणी : भविष्यात रेल्वे क्षेत्रात नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
- भरती प्रकार : अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार)
महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाईन अर्ज सुरु | 25 नोव्हेंबर 2025 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 24 डिसेंबर 2025 पर्यंत |
| मिरीत लिस्ट (अपेक्षित) | फेब्रुवारी 2026 |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही RRC उत्तर पश्चिम रेल्वे विभागाच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | शॉर्टलिस्टिंग |
| दुसरा टप्पा | गुणवत्ता यादी (दहावी+आयटीआय गुणांवर आधारित) |
| तिसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
| चौथा टप्पा | वैद्यकीय तपासणी |
- मासिक वेतन (Salary) : अप्रेंटिस ऍक्ट 1961 नुसार मासिक 11,000 रुपये देण्यात येईल
- वयोमर्यादा (Age Limit) : 24 डिसेंबर 2025 रोजी, सर्वसाधारण उमेदवारांचे वय किमान 15 वर्षे व कमाल 24 वर्षे असावे.
- [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्ष सूट ]
- नोकरीचे ठिकाण : RRC उत्तर रेल्वे विभागामध्ये
अर्ज शुल्क
| श्रेणी | शुल्क |
| General/OBC/EWS | 100/- रुपये |
| SC/ST/PWD/Woman | अर्ज शुल्क नाही |
RRC NR Apprentice Bharti 2025
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
- नोंदणी: अधिकृत आरआरसी एनआर वेबसाइटला भेट द्या (खालील लिंक). “एंगेजमेंट ऑफ अॅक्ट अप्रेंटिस” वर क्लिक करा आणि तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरून नोंदणी करा.
- लॉगिन: उमेदवाराच्या डॅशबोर्डवर लॉग इन करण्यासाठी तुमच्या ईमेल/मोबाइलवर पाठवलेला पासवर्ड वापरा.
- अर्ज भरा: तुमची वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक गुण प्रविष्ट करा. टीप: फक्त सर्वोत्तम ५ विषयांसाठीच नाही तर १०वीमधील सर्व विषयांसाठी गुणांची गणना करा.
- प्राधान्ये निवडा: तुमच्या ट्रेड रिक्त जागा कुठे उपलब्ध आहेत ते तुमचे क्लस्टर आणि युनिट काळजीपूर्वक निवडा.
- कागदपत्रे अपलोड करा: तुमचा फोटो, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा आणि संबंधित प्रमाणपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा (जेपीजी फॉरमॅट, १०-५० केबी).
- शुल्क भरा: अर्ज शुल्क ऑनलाइन भरा (लागू असल्यास).
- प्रिंट: फॉर्म सबमिट करा आणि अर्ज आणि शुल्क पावतीची प्रिंटआउट घ्या.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24 डिसेंबर 2025 पर्यंत
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
RRC NR Apprentice Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये आर आर सी दक्षिण रेल्वे विभागाकडे (RRC NR Apprentice Bharti 2025)निर्णय अंतिम असेल.
- अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. - जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
💁♂️IB MTS Bharti 2025: इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा