RRC EWR Recruitment 2025:रेल्वे विभागात करिअर घडवण्यासाठी इच्छुक आहात का? कारण RRC उत्तर पश्चिम रेल्वे विभागाने अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार)पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, या मध्ये दहावी/बारावी/आयटीआय पात्रता धारक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी मिळाली आहे. या भरती विविध ट्रेडमध्ये एकूण 2162 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे, जर तुम्ही भारतीय रेल्वेसोबत काम करण्याचे स्वप्न बघितले असेल तर या संधीचा नक्कीच फायदा करून घ्या. हि भरती केवळ प्रशिक्षण नाही तर यामध्ये तुम्हाला मासिक पगार देखील देण्यात येणार असून, या भरतीचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून त्याचा अंतिम दिनांक 2 नोव्हेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे.
RRC EWR Recruitment 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 2162 पदे
- पदाचे नाव : अप्रेंटिस शिकाऊ उमेदवार (मूळ जाहिरात वाचा)
- शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून दहावी किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. दहावीमध्ये किमान 50% एकूण गुण असणे अनिवार्य आहे. उमेदवारांकडे राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद (NCVT) किंवा राज्य व्यावसायिक प्रशिक्षण परिषद (SCVT) द्वारे जारी केलेली अधिसूचित व्यापारात राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र (NTC) देखील असणे आवश्यक आहे.
पदांचा तपशील
| अ. क्रं. | विभाग / कार्यशाळेचे नाव | पद संख्या |
| 1. | DRM कार्यालय, अजमेर | 426 |
| 2. | DRM कार्यालय, बिकानेर | 475 |
| 3. | DRM कार्यालय, जयपूर | 545 |
| 4. | DRM कार्यालय, जोधपूर | 450 |
| 5. | BTC कॅरेज, अजमेर | 097 |
| 6. | BTC लोको, अजमेर | 068 |
| 7. | कॅरेज वर्क्स शॉप, बिकानेर | 033 |
| 8. | कॅरेज वर्क्स शॉप, जोधपूर | 068 |
| एकुण | 2162 |
- भरती विभाग : RRC उत्तर पश्चिम रेल्वे विभागा अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- भरती श्रेणी : रेल्वे क्षेत्रात नोकरी मिळविण्याची संधी.
- भरती प्रकार : अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार)
महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाईन अर्ज सुरू | 3 ऑक्टोंबर 2025 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 2 नोव्हेंबर 2025 पर्यंत |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही RRC उत्तर पश्चिम रेल्वे विभागाच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | शॉर्टलिस्टिंग |
| दुसरा टप्पा | गुणवत्ता यादी (दहावी+आयटीआय गुणांवर आधारित) |
| तिसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
| चौथा टप्पा | वैद्यकीय तपासणी |
- वयोमर्यादा (Age Limit) : 2 नोव्हेंबर 2025 रोजी,15 ते 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्ष सूट ]
- मासिक वेतन (Salary) : अप्रेंटिस ऍक्ट 1961 नुसार मासिक वेतन मिळणार आहे.
- नोकरीचे ठिकाण : RRC उत्तर पश्चिम रेल्वे विभागामध्ये
अर्ज शुल्क
| General/OBC/EWS | 100/- रुपये |
| SC/ST/PWD/Woman | अर्ज शुल्क नाही |
RRC EWR Recruitment 2025
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
- अधिकृत RRC/NWR वेबसाइटला भेट द्या.
- होमपेजवर, “एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिस नोटिस क्र. 04/2025 (NWR/AA)” ची लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.
- तुम्ही पात्र आहात याची खात्री करण्यासाठी तपशीलवार सूचना काळजीपूर्वक वाचा.
- “ऑनलाईन अर्ज करा” लिंकवर क्लिक करा.
- तुमच्या वैयक्तिक तपशीलांसह, ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरसह नोंदणी फॉर्म भरा.
- तुमच्या नोंदणीकृत ईमेल/मोबाइलवर पाठवलेल्या नोंदणी क्रमांक आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करा.
- तुमच्या शैक्षणिक आणि इतर तपशीलांसह अर्ज फॉर्म भरा.
- तुमचा पसंतीचा विभाग/युनिट आणि ट्रेड निवडा.
- तुमच्या छायाचित्राच्या, स्वाक्षरीच्या आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरण्यासाठी पेमेंट गेटवेवर जा.
- यशस्वी पेमेंट केल्यानंतर, तुमचा अर्ज फॉर्म शेवटच्या वेळी तपासा आणि सबमिट करा.
- तुमच्या रेकॉर्डसाठी अंतिम अर्ज फॉर्म डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 2 नोव्हेंबर 2025 पर्यंत
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
RRC EWR Recruitment 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये आर आर सी दक्षिण रेल्वे विभागाकडे (RRC NWR Recruitment 2025)निर्णय अंतिम असेल.
- अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. - जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
खुशखबर | भारतीय रेल्वे विभागांतर्गत RRB NTPC 8875 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर | RRB NTPC Recruitment 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा