RRC ECE Apprentice Bharti 2025:रेल्वे विभागात करिअर घडवण्यासाठी इच्छुक आहात का? कारण RRC पूर्व मध्य रेल्वे विभागाने अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार)पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, या मध्ये दहावी/बारावी/आयटीआय पात्रता धारक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी मिळाली आहे. या भरती विविध ट्रेडमध्ये एकूण 1149 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे. जर तुम्ही भारतीय रेल्वेसोबत काम करण्याचे स्वप्न बघितले असेल तर या संधीचा नक्कीच फायदा करून घ्या. हि भरती केवळ प्रशिक्षण नाही तर यामध्ये तुम्हाला मासिक पगार देखील देण्यात येणार असून, या भरतीचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून त्याचा अंतिम दिनांक 25 ऑक्टोंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आलेली आहे ती वाचावी!
RRC ECE Apprentice Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 1149 पदे
- पदाचे नाव : अप्रेंटिस शिकाऊ उमेदवार (मूळ जाहिरात वाचा)
- शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक/दहावी किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केलेला असावा. उमेदवारांकडे राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेने (NCVT) जारी केलेले संबंधित व्यापारात राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र (ITI) किंवा NCVT/SCVT ने जारी केलेले तात्पुरते प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
पदांचा तपशील
| विभाग क्रं. | विभागाचे नाव | पद संख्या |
| 1. | दानापूर विभाग | 675 |
| 2. | धनबाद विभाग | 156 |
| 3. | पं.दीनदयाल उपाध्याय विभाग | 062 |
| 4. | सोनपूर विभाग | 047 |
| 5. | समस्तीपूर विभाग | 042 |
| 6. | प्लँट डेपो/पं. दीनदयाल उपाध्याय | 029 |
| 7. | कॅरेज रिपेअर वर्कशॉप/हरनॉट | 110 |
| 8. | मेकॅनिकल वर्कशॉप/समस्तीपूर | 028 |
| एकुण | 1149 |
- भरती विभाग : RRC पूर्व मध्य रेल्वे विभागा अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- भरती श्रेणी : रेल्वे क्षेत्रात नोकरी मिळविण्याची संधी.
- भरती प्रकार : अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार)
महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाईन अर्ज सुरू | 26 सप्टेंबर 2025 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 25 ऑक्टोंबर 2025 पर्यंत |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही RRC पूर्व मध्य रेल्वे विभागाच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | शॉर्टलिस्टिंग |
| दुसरा टप्पा | गुणवत्ता यादी (दहावी + आयटीआय गुणांवर आधारित) |
| तिसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
| चौथा टप्पा | वैद्यकीय तपासणी |
- वयोमर्यादा (Age Limit) : 26 सप्टेंबर 2025 रोजी, 15 ते 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्ष सूट ]
- मासिक वेतन (Salary) : अप्रेंटिस ऍक्ट 1961 नुसार मासिक वेतन मिळणार आहे.
- नोकरीचे ठिकाण : RRC पूर्व मध्य रेल्वे विभागामध्ये
अर्ज शुल्क
| General/OBC/EWS | 100/- रुपये |
| SC/ST/PWD/Woman | अर्ज शुल्क नाही |
RRC ECE Apprentice Bharti 2025
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
- अधिकृत आरआरसी/ईसीआर वेबसाइटला भेट द्या.
- “हाजीपूर मुख्यालय” विभागात जा आणि नंतर “आरआरसी/पटना” वर जा.
- “सूचना क्रमांक-आरआरसी/ईसीआर/एचआरडी/अॅक्ट. अप्रेंटिस/2025-26” साठी लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.
- तुमचा आधार क्रमांकासह तुमची वैयक्तिक माहिती भरून नोंदणी करा आणि तुमचे नाव, वडिलांचे नाव आणि जन्मतारीख तुमच्या प्रमाणपत्रांशी जुळत असल्याची खात्री करा.
- तुम्हाला एक नोंदणी क्रमांक मिळेल. भविष्यातील संदर्भासाठी हा क्रमांक सुरक्षित ठेवा.
- तुमच्या नोंदणी तपशीलांसह लॉग इन करा आणि सर्व आवश्यक माहितीसह ऑनलाइन अर्ज फॉर्म भरा.
- तुमच्या छायाचित्र, स्वाक्षरी आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.
- अर्ज शुल्क ऑनलाइन भरण्यासाठी पेमेंट गेटवेवर जा.
- पेमेंट यशस्वी झाल्यानंतर, तुम्हाला RRC वेबसाइटवर पुनर्निर्देशित केले जाईल.
- तुमच्या रेकॉर्डसाठी तुमच्या पूर्ण केलेल्या अर्जाचा फॉर्म डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 25 ऑक्टोबर 2025 रात्री 11:59 पर्यंत
महत्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
RRC ECE Apprentice Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये आर आर सी पूर्व मध्ये रेल्वे विभागाकडे (RRC ECE Apprentice Bharti 2025)निर्णय अंतिम असेल.
- अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. - जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
स्टाफ सिलेक्शन भरती दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी जाहिरात प्रसिद्ध | Delhi Police Constable Driver Bharti 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा