RRC CR Apprentice Requirement 2025 : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) ने अधिकृतपणे RRC सेंट्रल रेल्वे अप्रेंटिस भरती 2025 ची घोषणा केली आहे, जी भारतीय रेल्वेमध्ये करिअर घडवू इच्छिणाऱ्या ITI पात्र उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. तुम्ही तुमची दहावी पूर्ण केली असेल आणि तुमच्याकडे आयटीआय प्रमाणपत्र असेल, तर हा तुमच्यासाठी प्रतिष्ठित सरकारी क्षेत्रातील भूमिकेत पाऊल ठेवण्याचा क्षण आहे. या भरती मोहिमेचे उद्दिष्ट मध्य रेल्वेच्या विविध कार्यशाळा आणि युनिट्समधील विविध ट्रेडमध्ये जवळपास 2412 अप्रेंटिस रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. ही भरती मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रातील मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलापूर क्लस्टरसह विविध युनिट्ससाठी एक केंद्रीकृत अधिसूचना आहे. अप्रेंटिस कायदा, 1961 अंतर्गत अप्रेंटिसच्या नियुक्तीची सुविधा देत आहे. निवड पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित आहे, जी सर्व पात्र उमेदवारांना पारदर्शक आणि निष्पक्ष संधी प्रदान करते. ही एक प्रशिक्षण-आधारित भूमिका आहे जी तुम्हाला भारतीय रेल्वेमध्ये यशस्वी तांत्रिक कारकीर्दीसाठी आवश्यक असलेल्या व्यावहारिक कौशल्यांनी सुसज्ज करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. ही केवळ नोकरी नाही तर ही एक अमूल्य प्रत्यक्ष अनुभव मिळविण्याची आणि मासिक वेतन मिळवण्याची सुवर्ण संधी RRC ने दिली आहे, ज्यामुळे तुमच्या भविष्याचा मजबूत पाया रचला जाईल. आणि रेल्वे क्षेत्रात चांगले करियर घडवण्यासाठी तूम्ही यशस्वी होण्यासाठी चांगली संधी मिळेल. प्रस्तुत भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि अटी रेल्वेच्या https://recce.com या अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आले आहेत.या भरती प्रक्रियेचे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 12 ऑगस्ट 2025 रोजी सुरू होईल आणि 11 सप्टेंबर 2025 रोजी संपेल.(कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आलेले आहे ती वाचावी.)
RRC CR Apprentice Recruitment 2025 Details
अं क्रं. | युनिट | पद संख्या |
1. | मुंबई | 1582 |
2. | भुसावळ | 418 |
3. | पुणे | 192 |
4. | नागपूर | 144 |
5. | सोलापूर | 076 |
TOTAL | 2412 |
अर्ज स्विकारण्याची पद्धत :- पात्र 10 वी उत्तीर्ण / ITI उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
एकूण पदसंख्या :- 2412
पदाचे नाव :- अप्रेंटिस (Act Apprentice)
महत्त्वाच्या तारखा :-
1) ऑनलाइन अर्ज सुरू :- 12 ऑगस्ट 2025 पासून
2) अर्जाची शेवटची तारीख :- 11 सप्टेंबर 2025 पर्यंत
3) शुल्क भरण्याची शेवटची तारीख (ऑनलाइन):- 11 सप्टेंबर 2025 पर्यंत
(ऑनलाइन परीक्षेची तारीख अधिकृत संकेतस्थळावरती कळविण्यात येईल)
भरती विभाग :- रेल्वे रिक्वायरमेंट सेल (RRC) WR
भरती श्रेणी :- अप्रेंटिस (Apprentice)
(अत्यंत महत्त्वाचे :- सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा (Age Limit):- 12 ऑगस्ट 2025 रोजी, 15 ते 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क (Fee) :- General/OBC/EWS: 100/- रुपये [SC/ST/PWD/Woman फी नाही ]
मासिक वेतन (Salary ) :- 7000 रूपये मासिक
निवड प्रक्रिया (Selection Process) :-कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत नाही,गुणवत्तेवर आधारित निवड
गुणवत्ता यादी मॅट्रिक्युलेशन (१०वी) मधील गुणांच्या टक्केवारी (किमान ५०% एकूण गुणांसह) आणि ज्या ट्रेडमध्ये अप्रेंटिसशिप करायची आहे त्या ट्रेडमधील आयटीआय गुणांच्या आधारे मोजली जाईल.
दहावी आणि ITI दोन्ही गुणांना समान महत्त्व दिले जाईल. अंतिम पॅनेल दोन्ही पात्रतेतील गुणांच्या साध्या सरासरीवर आधारित असेल.
टाय-ब्रेकर: जर दोन उमेदवारांचे गुण समान असतील तर, जास्त वयाच्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. जर जन्मतारीख देखील समान असेल तर, मॅट्रिक्युलेशन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराचा प्रथम विचार केला जाईल.
कागदपत्रांची पडताळणी: गुणवत्ता यादीत शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना कागदपत्रांची पडताळणीसाठी बोलावले जाईल. या टप्प्यावर सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे.
वैद्यकीय तपासणी: रेल्वे प्रशासनाने ठरवलेल्या मानकांनुसार वैद्यकीय तपासणीत उमेदवार योग्य असल्याचे आढळल्यास अंतिम निवड केली जाईल.
नोकरीचे ठिकाण :- मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर, सोलापूर
ऑनाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 12 सप्टेंबर 2025
RRC CR Apprentice Recruitment Important Link
अधिकृत संकेतस्थळ | तेथे क्लिक करा |
जाहिरात pdf पहा | तेथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
RRC WR Recruitment Bharti 2025 - भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
ही पण जाहिरात बघा👇
ससून रुग्णालयात 354 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध 2025 https://mnknokari.com/sassoon-hospital-pune-bharti-2025/
हि जाहिरात तुमचे नातेवाईक / मित्र मैत्रिणींना पण शेअर करा