RRB Group D Level 1 Recruitment 2026 : भारतीय रेल्वेमध्ये सुरक्षित नोकरीच्या सोधत असलेल्या उमेदवारांसाठी भारतीय रेल्वेमध्ये सामील होण्यासाठी एक उत्तम संधी मिळाली आहे कारण रेल्वे भरती मंडळांनी (RRB) लेव्हल 1 साठी 2026 मध्ये एकूण 22,000 सहाय्यक पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. भरतीची अधिकृत घोषणा केली आहे ज्यामध्ये ट्रॅक मेंटेनर ग्रेड IV, असिस्टंट पॉइंट्समन आणि विविध तांत्रिक सहाय्यक पदांसह 11 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये जवळपास 22,000 जागा भरण्यासाठी भरती मोहीम राबविण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये सुरक्षित आणि स्थिर करिअर घडवण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. भारतीय रेल्वे मंडळाने दिलेली आहे. तसेच या भरतीमध्ये तुम्हाला आकर्षक पगार आणि असंख्य भत्ते, देखील मिळणार आहेत. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!
RRB Group D Level 1 Recruitment 2026
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 22,000 पदे
- पदाचे नाव : ट्रॅक मेंटेनर ग्रेड IV, असिस्टंट (ब्रिज, ट्रॅक मशीन, TRD, पॉइंट्समन-B इत्यादी. पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- शैक्षणिक पात्रता : १०वी उत्तीर्ण (मॅट्रिक): उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी ची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी
पदांचा तपशील
| पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | सहाय्यक (Track machine) | 600 |
| 2. | सहाय्यक (Bridge) | 600 |
| 3. | ट्रॅक मेंटेनर गट IV | 11000 |
| 4. | सहाय्यक (P-Way) | 300 |
| 5. | सहाय्यक (TRD) | 800 |
| 6. | सहाय्यक लोको शेड (Electrical) | 200 |
| 7. | सहाय्यक ऑपरेशन्स (Electrical) | 500 |
| 8. | सहाय्यक (TL & AC) | 500 |
| 9. | सहाय्यक (C & W) | 1000 |
| 10. | पॉइंट्समन-B | 5000 |
| 11. | सहाय्यक (S & T) | 1500 |
| एकुण | 22,000 |
- भरती विभाग : भारतीय रेल्वे मंडळा अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
- नोकरीचा प्रकार : रेल्वे विभागात कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
- नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)
महत्त्वाच्या तारखा
| अधिसूचना मंजुरी | 12 डिसेंबर 2025 रोजी |
| ऑनलाईन अर्ज सुरू | लवकरच कळवले जाईल. |
| अर्जाची शेवटची तारीख | लवकरच कळवले जाईल. |
| लेखी परिक्षा (CBT) | लवकरच कळवले जाईल. |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही भारतीय रेल्वे मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | लेखी परिक्षा (CBT) |
| दुसरा टप्पा | शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) |
| तिसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
| चौथा टप्पा | वैद्यकीय तपासणी |
- मासिक वेतन (Salary) : बेसिक 18,000 रुपये म्हणजे 25,000 पर्यंत इन हॅण्ड वेतन मिळणार आहे.
- वयोमर्यादा (Age Limit) : 01 जानेवारी 2026 रोजी पात्रता धारक उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे व कमाल वयोमर्यादा 33 वर्षे देण्यात आलेली आहे.
- [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क
| श्रेणी | शुल्क |
| General/EWS/OBC | 500/- रुपये |
| SC/ST/EBC/महिला/अल्पसंख्याक | 250/- रुपये |
टीप : नियमांनुसार, ऑनलाईन लेखी परीक्षेसाठी हजर झाल्यानंतर शुल्क सामान्यतः (अंशतः/पूर्णपणे) परत केले जाते.
RRB Group D Level 1 Recruitment 2026
ऑनलाईन अर्ज कसा करायचा
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या: तुमच्या संबंधित आरआरबी क्षेत्राच्या अधिकृत वेबसाइटवर जा (लिंक्स खाली दिलेल्या आहेत).
- नोंदणी करा: CEN लेव्हल-1 2026 साठी ‘नवीन नोंदणी’ (New Registration) लिंकवर क्लिक करा. तुमचे नाव, जन्मतारीख, आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर यांसारखे मूलभूत तपशील प्रविष्ट करा.
- लॉग इन करा: तुमच्या ईमेल/मोबाईलवर पाठवलेला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
- अर्ज भरा: शैक्षणिक तपशील, पत्ता आणि पदांची पसंती यासह अर्ज पूर्ण भरा.
- कागदपत्रे अपलोड करा: तुमचा अलीकडील छायाचित्र, स्वाक्षरी आणि श्रेणी प्रमाणपत्राच्या (लागू असल्यास) स्कॅन केलेल्या प्रती विहित नमुन्यात अपलोड करा.
- शुल्क भरा: नेट बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड किंवा UPI द्वारे अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.
- अर्ज सादर करा: सर्व तपशील काळजीपूर्वक तपासा आणि ‘सबमिट’ (Submit) वर क्लिक करा. भविष्यातील संदर्भासाठी पुष्टीकरण पृष्ठाची प्रिंट काढा.
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| व्हॉट्सॲप ग्रुप | येथे क्लिक करा |
| टेलिग्राम चैनल | येथे क्लिक करा |
RRB Group D Level 1 Recruitment 2026
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये RRB चा (RRB Group D Level 1 Recruitment 2026) निर्णय अंतिम असेल.
- अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. - जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
💁♂️RITES Limited Bharti 2025: रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस लिमिटेड (RITES) अंतर्गत 400 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा
2 thoughts on “RRB Group D Level 1 Recruitment 2026 : रेल्वे भरती मंडळांनी (RRB) गट- ड लेव्हल 1 साठी एकूण 22,000 जागांसाठी मेगा भरती 2026”