RRB ALP Recruitment 2026: रेल्वे भरती मंडळाने ‘सहाय्यक लोको पायलट’ (ALP) या पदांवरील रिक्त पदांसाठी एका मोठ्या भरती मोहिमेची घोषणा केली आहे. भारतीय रेल्वेमध्ये स्थिर सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. एकूण ११,१२७ रिक्त पदांची घोषणा करण्यात आल्याने, ही भरती या वर्षातील सर्वात मोठ्या संधींपैकी एक ठरणार आहे. रुपये १९,००० मूळ वेतन आणि आकर्षक भत्त्यांसह एक सुरक्षित करिअर मार्ग प्रदान करते. पात्रता, वेतन रचना, निवड प्रक्रिया आणि अर्ज करण्याची सविस्तर माहिती या लेखात दिली आहे. उमेदवारांना विनंती आहे की, अर्ज करण्यापूर्वी त्यांनी सविस्तर जहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचावी.
RRB ALP Recruitment 2026
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : ११,१२७ पदे
- पदाचे नाव : सहाय्यक लोको पायलट पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- शैक्षणिक पात्रता : उमदेवारांनी १०वी उत्तीर्ण+आयआयटी/डिप्लोमा कोर्स.
टीप: पदासाठीच्या विशिष्ट आवश्यकतांसाठी, कृपया अधिसूचना प्रसिद्ध झाल्यावर सविस्तर अधिसूचनेचा संदर्भ घ्या.
पदांचा तपशील
| पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | सहाय्यक लोको पायलट | ११,१२७ |
- भरती विभाग : भारतीय रेल्वे मंडळा अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
- नोकरीचा प्रकार : रेल्वे विभागात कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
- नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)
महत्त्वाच्या तारखा
| अर्ज सुरू | 15 मे 2026 पासून |
| शेवटची तारीख | 14 जून 2026 पर्यंत |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही भारतीय रेल्वे मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | संगणक-आधारित चाचणी (CBT) – I |
| दुसरा टप्पा | संगणक-आधारित चाचणी (CBT) – II |
| तिसरा टप्पा | संगणक-आधारित अभियोग्यता चाचणी (CBAT) |
| चौथा टप्पा | कागदपत्रांची पडताळणी |
| पाचवा टप्पा | वैद्यकीय तपासणी |
- मासिक वेतन (Salary) : बेसिक 19,000 रुपये म्हणजे 30,000+ पर्यंत इन हॅण्ड वेतन मिळणार आहे.
- वयोमर्यादा (Age Limit) : 15 मे 2026 रोजी पात्रता धारक उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे व कमाल वयोमर्यादा 33 वर्षे देण्यात आलेली आहे.
- [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क
| श्रेणी | शुल्क |
| अमागासवर्गीय उमेदवारांसाठी | 500/- रुपये |
| मागासवर्गीय उमेदवारांसाठी | 250/- रुपये |
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
RRB ALP Recruitment 2026
उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये RRB चा (RRB ALP Recruitment 2026) निर्णय अंतिम असेल.
- अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
SSB Constable Bharti 2026: 10वी पाससाठी 827 जागा | Online अर्ज सुरू
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा