RBI Office Attendant Bharti 2026: 572 जागांसाठी मोठी सरकारी भरती, 10वी पास उमेदवारांसाठी संधी

RBI Office Attendant Bharti 2026: बँकिंग क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक उत्तम संधी निर्माण करून दिलेली आहे, ज्यामध्ये ऑफिस अटेंडंट पदासाठी अर्ज मागवण्यात येत असून  या मध्ये 572 रिक्तू पदे भरण्यात येणार असून ही एक उमेदवारांसाठी खुप चांगली संधी आहे. या भरतीची वैशिष्ट्य म्हणजे सुरक्षितता आणि स्थिर करिअर घडवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीमध्ये तुम्हाला आकर्षक पगार आणि असंख्य भत्ते, देखील मिळणार आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत देण्यात आलेला आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी  मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

RBI Office Attendant Bharti 2026

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 572 पदे
  • पदाचे नाव : ऑफिस अटेंडंट पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने ज्या भरती कार्यालयासाठी अर्ज केला आहे, त्या कार्यालयाच्या प्रादेशिक अधिकारक्षेत्रात येणाऱ्या संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेशातून १०वी (SSC/मॅट्रिक) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. ही पात्रता त्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या मान्यताप्राप्त मंडळाकडून मिळवलेली असावी.

पदांचा तपशील

पद क्रं. पदाचे नाव  पद संख्या 
1. ऑफिस अटेंडंट 572
  • भरती विभाग : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात आहे.
  • नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू 15 जानेवारी 2026 पासून
शेवटची तारीख 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत
लेखी परिक्षा 28 फेब्रुवारी ते 01 मार्च 2026

[अत्यंत महत्त्वाची सूचना : सदर भरतीची जाहिरात ही रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेण्यात आलेली आहे. तथापि, या लेखात अपूर्ण माहिती असण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा ऑनलाईन लेखी परिक्षा (CBT)
दुसरा टप्पा स्थानिक भाषा चाचणी
तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
  • मासिक वेतन (Salary) : बेसिक 24250/- ते 53550/- रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : सर्वसाधारण उमेदवाराचे वय किमान18 व कमाल 25 वर्षे असावे.
  • [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्ष सूट]

अर्ज शुल्क

श्रेणी शुल्क
General/OBC/EWS 450/- रुपये + GST
SC/ST/PwBD/Exm 50/- रुपये + GST
अर्ज असा करा 
  1. अधिकृत पोर्टलला भेट द्या: “आरबीआय ऑफिस अटेंडंट भरती २०२६” साठी खाली दिलेल्या विशिष्ट लिंकचा वापर करा.
  2. नोंदणी: “नवीन नोंदणी” वर क्लिक करा आणि तुमचे नाव, संपर्क तपशील आणि ईमेल प्रविष्ट करा. तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवून घ्या.
  3. अर्ज भरा: लॉग इन करा आणि तुमचा वैयक्तिक तपशील, शैक्षणिक पात्रता आणि कार्यालयाची पसंती भरा.
  4. कागदपत्रे अपलोड करा:
    छायाचित्र: (४.५ सेमी x ३.५ सेमी)
    स्वाक्षरी: (काळ्या शाईने)
    डाव्या अंगठ्याचा ठसा: (पांढऱ्या कागदावर काळ्या/निळ्या शाईने)
    हस्तलिखित घोषणापत्र: खालील मजकूर पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने इंग्रजीमध्ये लिहा: “मी, _______ (उमेदवाराचे नाव), याद्वारे घोषित करतो की, अर्जामध्ये माझ्याद्वारे सादर केलेली सर्व माहिती अचूक, सत्य आणि वैध आहे. आवश्यकतेनुसार मी सहाय्यक कागदपत्रे सादर करेन.”
  5. शुल्क भरणे: डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंग/यूपीआय द्वारे शुल्क ऑनलाइन भरा.
  6. अंतिम सादर करणे: भविष्यातील संदर्भासाठी ई-पावती आणि अंतिम अर्ज फॉर्मची प्रिंट काढा.

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा

RBI Office Attendant Bharti 2026

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये RBI चा  (RBI Office Attendant Bharti 2026) निर्णय अंतिम असेल.
  • अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
Bank of Maharashtra Apprentice Bharti 2026 | 600 जागांसाठी मोठी भरती, अर्ज 25 जानेवारी 2026 पर्यंत

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

1 thought on “RBI Office Attendant Bharti 2026: 572 जागांसाठी मोठी सरकारी भरती, 10वी पास उमेदवारांसाठी संधी”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo