Punjab National Bank LBO Bharti 2025:बँकिंग क्षेत्रात करियर घडवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी सुवर्ण संधी चालून आलेली आहे. कारण पंजाब नॅशनल बँकेने (PNB) LBO भरती २०२५ करिता भारतातील इच्छुक बँकर्ससाठी एक महत्त्वाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. “पीएनबी ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल-I (JMGS-I) मध्ये स्थानिक बँक अधिकारी (एलबीओ)” 750 रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पंजाब नॅशनल बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक आहे या क्षेत्रातील करिअर हे केवळ नोकरी नाही तर ती प्रतिष्ठेची आणि सुरक्षतेची बाब असल्याने, ही भरती मोहीम सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग उद्योगात स्थिर आणि फायदेशीर कारकीर्द मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेले आहेत. उमेदवारांना कृपया अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आलेले आहे ती वाचावी!
Punjab National Bank LBO Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 0750 पदे
- पदाचे नाव : पीएनबी ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल-I (JMGS-I) मध्ये स्थानिक बँक अधिकारी (LBO) पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्या शाखेतील पदवी फक्त नसणे आवश्यक आहे.
पदांचा तपशील
| राज्य | अनिवार्य स्थानिक भाषा | पद संख्या |
| आंध्र प्रदेश | तेलगू | 05 |
| गुजरात | गुजराती | 95 |
| कर्नाटक | कन्नड | 85 |
| महाराष्ट्र | मराठी | 135 |
| तेलंगणा | तेलगू | 88 |
| तमिळनाडू | तमिळ | 85 |
| पश्चिम बंगाल | बंगाली | 90 |
| जम्मू आणि काश्मीर | उर्दू/ डोगरी/ काश्मिरी | 20 |
| लडाख | उर्दू/पुरगी/भोटी | 03 |
| अरुणाचल प्रदेश | इंग्रजी | 05 |
| आसाम | आसामी/ बोडो | 86 |
| मणिपूर | मणिपुरी/ मेईतेई | 08 |
| मेघालय | गारो/ खासी | 08 |
| मिझोरम | मिझो | 05 |
| नागालँड | इंग्रजी | 05 |
| सिक्कीम | नेपाळी/ सिक्कीमी | 05 |
| त्रिपुरा | बंगाली/ कोकबोरोक | 22 |
| एकुण | 750 |
- भरती विभाग : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
- नोकरीचा प्रकार : बँकिंग क्षेत्रात कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
- नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)
महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाईन अर्ज सुरू | 3 नोव्हेंबर 2025 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत |
| परीक्षेची तारीख | डिसेंबर 2025/जानेवारी 2026 |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही पंजाब नॅशनल बँकच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | ऑनलाईन लेखी परीक्षा |
| दुसरा टप्पा | अर्ज व कागदपत्र पडताळणी |
| तिसरा टप्पा | मुलाखत (Interview) |
- मासिक वेतन (Salary) : बेसिक 48,480/- ते 85,920/- रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
- वयोमर्यादा (Age Limit) : 1 जून 2025 रोजी खुल्या प्रवर्गासाठी किमान वय 18 वर्ष व कमाल 28 वर्षे असणे आवश्यक आहे.
- [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्ष सूट ]
अर्ज शुल्क
| श्रेणी | शुल्क |
| General/OBC/EWS | ₹1000 + ₹180 (GST) = ₹1180/- रुपये |
| SC/ST/PWD | ₹50 + ₹9 (GST) = ₹59/- रुपये |
Punjab National Bank LBO Bharti 2025
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत रात्री 11:59 वाजेपर्यंत
अर्ज करण्याचे टप्पे
- अधिकृत पीएनबी करिअर पेजला भेट द्या (खाली दिलेली लिंक) आणि “रिक्रूटमेंट्स” वर क्लिक करा.
- “७५० स्थानिक बँक अधिकाऱ्यांची भरती” साठी लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.
- तुम्हाला आयबीपीएस अर्ज पोर्टलवर पुनर्निर्देशित केले जाईल. “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” वर क्लिक करा.
- तुमची मूलभूत माहिती (नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी) एंटर करा आणि नोंदणी करा. एक प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तयार केला जाईल.
- लॉग इन करा आणि तुमच्या वैयक्तिक, शैक्षणिक आणि अनुभवाच्या तपशीलांसह तपशीलवार अर्ज फॉर्म भरा.
- तुमचा स्कॅन केलेला फोटो, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा आणि निर्दिष्ट परिमाणांनुसार हस्तलिखित घोषणापत्र अपलोड करा.
- तुमची शैक्षणिक, अनुभव आणि श्रेणी प्रमाणपत्रे पीडीएफ स्वरूपात अपलोड करा.
- सर्व तपशील बरोबर आहेत याची खात्री करण्यासाठी तुमच्या संपूर्ण अर्ज फॉर्मचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करा. अंतिम सबमिशननंतर कोणतेही बदल करता येणार नाहीत.
- “पेमेंट” टॅबवर जा आणि डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरून ऑनलाइन अर्ज शुल्क भरा.
- यशस्वी पेमेंटनंतर, एक पुष्टीकरण ई-पावती तयार केली जाईल.
- तुमच्या अंतिम सबमिट केलेल्या अर्जाचा फॉर्म आणि तुमच्या नोंदींसाठी ई-पावती डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
Punjab National Bank LBO Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मनात घेतली जाणार नाही.(Punjab National Bank LBO Bharti 2025)
- मुलाखतीसाठी उमेदवारांना बोलावण्याचा बँकेचा निर्णय अंतिम असेल. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
- उमेदवारांच्या भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही उमेदवाराची उमेदवारी नाकारण्याचा अधिकार बँकेकडे राखून ठेवला आहे, जर अपात्र असल्याचे आढळले किंवा चुकीची माहिती/प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर केली किंवा कोणतीही ‘भौतिक तथ्ये’ लपवली असतील, आणि अपात्र उमेदवारांनी भरलेले शुल्क जप्त केले जाईल.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.
हि जाहिरात पण पहा 👇
💁♂️Territorial Army Southern Command Recruitment 2025 |टेरिटोरियल आर्मीने सदर्न कमांड सोल्जर रिक्रूटमेंट रॅली 1422 पदांसाठी भरती 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा
4 thoughts on “पंजाब नेशनल बँक अंतर्गत 750 ‘स्थानिक बँक अधिकारी’ पदांसाठी जाहिरात 2025 | Punjab National Bank LBO Bharti 2025”