राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध | Pune Mahanagar Palika Bharti 2025

Pune Mahanagar Palika Bharti 2025 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे महानगरपालिकेमध्ये वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस)” पदाची 22 रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून. इच्छुक असाल तर हि जाहिरात नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कारण राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2025 पुणे महानगरपालिके अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पात्रताधारक उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. या भरतीचे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरायचे असून अंतिम दिनांक 7 ऑक्टोंबर 2025 पर्यंत सादर करण्यास उमेदवारांना आवाहन केले आहे. उमेदवारांची निवड हि थेट मुलाखती द्वारे  होणार असून, उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Pune Mahanagar Palika Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 022 पदे
  • पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (MBBS/BAMS)” पदाकरीता भरती
  • शैक्षणिक पात्रता : वैद्यकीय अधिकारी MBBS: MBBS (MCI/MMC कौन्सिलकडून नोंदणी आणि नूतनीकरण अनिवार्य आहे)
    वैद्यकीय अधिकारी BAMS: B.A.M.S. (महाराष्ट्र भारतीय औषध परिषदेकडून नोंदणी आणि नूतनीकरण अनिवार्य आहे)

पदांचा तपशील

पद क्रं. पदाचे नाव  पद संख्या 
1. •वैद्यकीय अधिकारी MBBS

•वैद्यकीय अधिकारी BAMS

022
  • भरती विभाग : पुणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरती
  • मासिक वेतन : दरमहा 40,000 ते 60,000 रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
  • नोकरीचे ठिकाण : पुणे शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात (महाराष्ट्र)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू तारीख 26 सप्टेंबर 2025 रोजी
अर्जांची अंतिम तारीख 07 ऑक्टोंबर 2025 पर्यंत
मुलाखत/Interview 7 ऑक्टोंबर 2025 रोजी

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही पुणे शहर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा  मुलाखत (Interview)
दुसरा टप्पा  कागदपत्र पडताळणी
  • अर्ज शुल्क (Fee) : अर्ज शुल्क नाही
  • वयोमर्यादा (Age Limit) : सर्व गटातील उमेवारांसाठी कमाल वयोमर्यादा 70 वर्षे देण्यात आलेली आहे.
  • मुलाखतीची पत्ता : छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जुना जी. बी. हॉल तिसरा मजला, शिवाजी बर, पुणे महानगरपालिका, पुणे 411005

अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक : 07 ऑक्टोंबर 2025 पर्यंत.

महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा

Pune Mahanagar Palika Bharti 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील दिलेल्या संकष्ट दिनांक 7 ऑक्टोंबर 2025 च्या आत आलेले अर्ज ग्राह्य धरले जातील.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी व मोबाईल नंबर वैध राहणे आवश्यक राहील.
  4. शासकीय, निमशासकीय, खाजगी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असणा-या संबंधित अनुभवाचाच विचार निवड प्रक्रियेत करण्यात येईल. ज्या पदाकरिता अर्ज केला आहे त्याच पदाचा असलेला अनुभव ग्राहय धरण्यात येईल.
  5. वरिल पदे ही कंत्राटी स्वरुपाची व एकत्रित मानधन तत्वानुसार भरण्यात येणार असून सदरील नियुक्ती आदेश हे निर्गमित केलेल्या तारखेपासुन ते 11 महिने 29 दिवस पर्यंतच्या कालावधीकरिता भरण्यात येणार आहेत. पुढील पुनर्नियुक्ती आपल्या कामगिरी मुल्यांकनावर आधरित असेल.(Pune Mahanagar Palika Bharti 2025)
  6. अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांचा सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचुक नोंदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहतील याची दक्षता घ्यावी.
  7. वरील नमुद पदे ही राज्य शासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत. सदर पदावर शासकीय सेवेप्रमाणे असलेले नियम अटी व शर्ती याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही तसेच यापदासाठी शासनाचे सेवानियम लागू नाहीत.
  8. केंद्र / राज्य शासनाने संबंधित पदे नामंजूर केल्यास उमेदवाराची सेवा कोणतीही पूर्वसूचना न देता तात्काळ समाप्त करण्याचा अधिकार मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेला आहे.
  9. अर्जदार हा संबधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदारा विरुध्द् कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
  10. अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचेसोईनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणीकरता येणार नाही.
  11. अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांच्या सध्या सुरु असलेला मोबाईलनंबर व ई-मेलआयडी अचूक नोंदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्णहोईपर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी.
  12. भरती प्रक्रियेदरम्यान ज्या-ज्या उमेदवारांना बोलविण्यात येईल, त्या-त्या वेळी त्यांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. तसेच सदर उपस्थितीकरीता कोणतेही मानधन अथवा प्रवास खर्च देव राहणार नाही.
  13. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदाकरिता नवीन जाहिरात प्रसिद्ध |  Delhi Police Head Constable Recruitment 2025 

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo