Pune DCC Bank Recruitment 2025:पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (पुणे DCC बँक – PDCC बँक) अंतर्गत लिपिक (लेखनिक) या पदांसाठी रिक्त जागा जागा भरण्यासाठी उमेदवारांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे, बँकिंग क्षेत्रात करिअर सुरू करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ही एक सुवर्ण संधी आहे. DCC बँक अंतर्गत एकूण 434 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. जर तुम्ही पात्रता निकष पूर्ण करत असाल आणि यशस्वी बँकिंग कारकिर्दीचा पाया रचण्यास उत्सुक असाल, तर ही संधी आहे गमावू नका, रिक्त पदांचे तपशील, पात्रता, पगार, निवड प्रक्रिया सर्व माहिती या लेखात दिली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आली आहे. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात वाचावी!
Pune DCC Bank Recruitment 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 434 पदे
- पदाचे नाव : लिपिक (लेखनिक) पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या भरती साठी अर्ज सादर करू शकतात.
पदांचा तपशील
| पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | लिपिक (लेखनिक) | 434 |
- भरती विभाग : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात आहे.
- नोकरीचा प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळण्याची चांगली संधी.
- नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)
महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाईन अर्ज सुरू | 1 डिसेंबर 2025 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 20 डिसेंबर 2025 पर्यंत |
| परिक्षा तारीख | नंतर कळवण्यात येईल |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | ऑनलाईन परिक्षा |
| दुसरा टप्पा | मुलाखत Interview |
| तिसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
- मासिक वेतन (Salary) : उमेदवारांना 20,000 रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
- वयोमर्यादा (Age Limit) : 1 डिसेंबर 2025 रोजी
सर्वसाधारण उमेदवाराचे वय 20 ते 38 वर्षे दरम्यान असावे. - अर्ज शुल्क : सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 885/- रुपये असेल.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 20 डिसेंबर 2025 पर्यंत रात्री 11:59 वाजेपर्यंत
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | PDF-1 PDF -2 |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
Pune DCC Bank Recruitment 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.(Pune DCC Bank Recruitment 2025)
- अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
पंजाब नेशनल बँक अंतर्गत 750 ‘स्थानिक बँक अधिकारी’ पदांसाठी जाहिरात 2025 | Punjab National Bank LBO Bharti 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा
1 thought on “पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये नवीन 434 जागांसाठी लेखनिक” पदांच्या भरती जाहीर 2025: Pune DCC Bank Recruitment 2025”