NHPC Bharti 2025:नॅशनल हायड्रो पॉवर कार्पोरेशन लिमिटेड ही भारताची सर्वात मोठी जलविद्युत विकास संस्था आहे. NHPC लिमिटेडने त्यांची बहुप्रतिक्षित NHPC नॉन-एक्झिक्युटिव्ह भरती 2025 साठी 248 रिक्त जागा भरण्यासाठी जाहीरात प्रसिद्ध केली आहे, ज्यामुळे गतिमान आणि प्रतिभावान व्यक्तींना त्यांच्या प्रतिष्ठित नवरत्न सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीमध्ये सामील होण्यासाठी एक सुवर्ण संधी पात्रता धारक कर्तुत्ववान उमेदवारांना मिळाली आहे. वीज क्षेत्रात स्थिर आणि फायदेशीर करियर घडवण्याची हि खूप चांगली उल्लेखनीय संधी आहे.(NHPC Bharti 2025)या भरती मोहिमेत सामील होणाऱ्या उमेदवारांना मासिक 1,40,000 पर्यंतचे वेतन मिळणार आहे. या भरती मिहिमे अंतर्गत खूपसाऱ्या सरकारी नोकरीत करियर घडवणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी.
NHPC Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 0248
- पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता, पर्यवेक्षक, वरिष्ठ लेखापाल, इ. (मूळ झाला तर pdf स्वरूपात वाचावी.)
पदांचा तपशील:
| पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | Assistant Rajbhasha (Officer) | 011 |
| 2. | Junior Engineer (Civil) | 109 |
| 3. | Junior Engineer (Electrical) | 046 |
| 4. | Junior Engineer (Mechanical) | 049 |
| 5. | Junior Engineer (E&C) | 017 |
| 6. | Supervisor (IT) | 001 |
| 7. | Sr. Accountant | 010 |
| 8. | Hindi Translator | 005 |
| TOTAL | 248 |
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता NHPC ने ठरवलेल्या पात्रता निकषांची पूर्तता बघण्यासाठी सविस्तर जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आलेली आहे ती वाचावी.
महत्त्वाच्या तारखा :
- ऑनलाइन अर्ज सुरूः 02 सप्टेंबर 2025 पासून
- अर्जाची शेवटची तारीखः 01 ऑक्टोंबर 2025 पर्यंत रात्री 23:59 पर्यंत
- शुल्क भरण्याची शेवटची तारीख (ऑनलाइन): 01 ऑक्टोंबर 2025 पर्यंत
- ऑनलाईन (CBT)परीक्षेची तारीख :- NHPC च्या अधिकृत संकेतस्थळावरती कळवण्यात येईल.
- भरती विभाग : NHPC लिमिटेड नॉन-एक्झिक्युटिव्ह अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- नोकरीचा प्रकार : कायमस्वरूप
- नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत (Job In India)
(अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही NHPC लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
NHPC Bharti 2025
- अर्ज शुल्क (Fee): General/OBC/EWS: 708/- रुपये [SC/ST/PWD/Woman/माजी सैनिक/ अर्ज शुल्क माफ राहील.]
- मासिक वेतन (Salary ) : दरमहा 27,000 ते 1,40,000/ रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
- वयोमर्यादा (Age Limit): अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखे पर्यंत सर्व पदांसाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्ष राहील, [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
- PwBD General 10 वर्ष सूट असेल
- PwBD OBC 13 वर्ष सूट असेल
- PwBD SC/ST 10 वर्ष सूट असेल
निवड प्रक्रिया (Selection Process):
- पहिला टप्पा : संगणक आधारित परीक्षा (CBT)
- दुसरा टप्पा : कागदपत्र पडताळणी
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: 01 ऑक्टोंबर 2025 पर्यंत
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| जाहिरात pdf पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज येथे | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची पद्धत:
- अधिकृत NHPC च्या संकेतस्थळाला भेट द्या.
- होमपेजवरील “करिअर” हा विभाग निवडा
- “NHPC मधील नॉन-एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती (जाहिरात क्रमांक: NH/Rectt./04/2025)” या लिंकवर क्लिक करा.
- सूचना काळजीपूर्वक वाचा आणि “ऑनलाइन अर्ज करा” या ऑप्शन वरती क्लिक करा.
- सर्व आवश्यक तपशीलांसह अर्जामध्ये माहिती भरा.
- तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि इतर कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.
- अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा (ऑनलाइन ऑप्शन लागू असल्यास).
- तुम्ही तुमच्या अर्जामध्ये माहिती व्यवस्थितरित्या भरले आहे का नाही त्याचे पुनरावलोकन करा आणि अर्ज सबमिट करा.
- ऑनलाइन अर्ज भरलेल्या अर्जाचे प्रत तुमच्या नोंदींसाठी अंतिम अर्ज फॉर्मची प्रिंटआउट घ्या.
NHPC Bharti 2025
⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध (Valid) ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी (Mobile No.) असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेची तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पध्दतीने देण्यात येणार असल्याने, भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- लेखी चाचणी आणि कागदपत्र पडताळणी साठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मनात घेतली जाणार नाही.
- वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणांमध्ये वाढ, घट अथवा बदल होण्याची शक्यता आहे.
- प्रस्तुत जाहीरातीस अनुसरुन अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता / अनुभव धारण करणे आवश्यक आहे.
- उमेदवारांच्या भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही उमेदवाराची उमेदवारी नाकारण्याचा अधिकार NHPC लिमिटेडकडे राखून ठेवला आहे, जर अपात्र असल्याचे आढळले किंवा चुकीची माहिती/प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर केली किंवा कोणतीही ‘भौतिक तथ्ये’ लपवली असतील, आणि अपात्र उमेदवारांनी भरलेले शुल्क जप्त केले जाईल.
- अनुभवाच्या कालावधीची गणना प्रस्तूत जाहीरातीस अनुसरुन अर्ज सादर करण्याकरीता विहित केलेल्या अंतिम दिनांकास करण्यात येईल.
- भरती प्रक्रियेबाबतचे सर्व अधिकार नियुक्ती प्राधिकारी यांना असून कोणत्याही टप्प्यावर भरती स्थगित किंवा रद्द करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांचेकडे राखून ठेवले आहे.(NHPC Bharti 2025)
- उमेदवाराने या भरती प्रकियेसंदर्भातील माहिती व सूचना महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनी यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द होणार असल्याने भरती प्रक्रिया पूर्ण हाईपर्यंत https://www.nhpcindia.com/ वरील संकेतस्थळावर उमेदवारांनी सद्यस्थिती (updates) वेळोवेळी पहावी.
- परीक्षेसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा प्रवास खर्च देय नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील दिलेली जाहिरात pdf सविस्तर वाचवी.
हि जाहिरात पण पहा 👇
हि जाहिरात तुमचे नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा