NHM Nagpur Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपुर अंतर्गत 53 जागांसाठी भरती 2025

NHM Nagpur Bharti 2025: आरोग्य क्षेत्रात नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपुर अंतर्गत विविध रिक्त पदे करार तत्वावर भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून यामध्ये जवळपास 53 रिक्त जागांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत, पात्रताधारक उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. या भरतीचे अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 24 डिसेंबर 2025 पर्यंत सादर करण्यास उमेदवारांना आवाहन केले आहे. उमेदवारांची निवड हि थेट मुलाखती द्वारे  होणार असून या भरती मोहिमेमध्ये कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा नाही. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

NHM Nagpur Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 53 पदे
  • पदाचे नाव : RBSK- वैद्यकीय अधिकारी, कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य – जिल्हा साथरोग विशेषज्ञ (IDSP), DEIC आणि NPPCD- श्रवणशास्त्रज्ञ आणि वाचा उपचारतज्ञ, NLEP, NPHCE फिजिओथेरपिस्ट आणि DEIC- व्यवसायोपचार तज्ञ, NTEP, IPHS – प्रयोगशाळा तंत्रज्ञ, NOHP- दंत आरोग्यतज्ञ, टीबी पर्यवेक्षक-STS, BPHU- सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, BPHU- कीटकशास्त्रज्ञ, BPHU-प्रयोगशाळा तंत्रज्ञ, NUHM- सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (PHM), NUHM-प्रयोगशाळा तंत्रज्ञ, NUHM-औषध निर्माता, NUHM- स्टाफ नर्स/LHV पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी मुळ जाहिरात पहा.

NHM Nagpur Bharti 2025

  • भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपुर यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरती नोकरी मिळवण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : नागपुर जिल्हा (महाराष्ट्र)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू तारीख 15 डिसेंबर 2025 पासून
अर्जाची अंतिम तारीख 24 डिसेंबर 2025 पर्यंत
मुलाखत/Interview नंतर कळविण्यात येईल

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपुर जिल्हाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा मुलाखत (Interview)
दुसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
  • वयोमर्यादा (Age Limit) : खुल्या गटातील उमेवारांसाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्षे व राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी कमाल 43 वर्षे देण्यात आलेली आहे.
  • मासिक वेतन (Salary) : दरमहा 17,000 ते 40,000 रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.

अर्ज शुल्क

श्रेणी शुल्क
अमागासवर्गीय उमेदवारांसाठी 150/- रुपये
मागासवर्गीय उमेदवारांसाठी 100/- रुपये
महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
व्हॉट्सॲप ग्रुप  येथे क्लिक करा
टेलिग्राम चॅनेल येथे क्लिक करा

NHM Nagpur Bharti 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील दिलेल्या पत्त्यावरती दिनांक 24 डिसेंबर 2025 च्या आत आलेले अर्ज ग्राह्य धरले जातील.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी व मोबाईल नंबर वैध राहणे आवश्यक राहील.
  4. शासकीय, निमशासकीय, खाजगी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असणा-या संबंधित अनुभवाचाच विचार निवड प्रक्रियेत करण्यात येईल. ज्या पदाकरिता अर्ज केला आहे त्याच पदाचा असलेला अनुभव ग्राहय धरण्यात येईल.
  5. वरिल पदे ही कंत्राटी स्वरुपाची व एकत्रित मानधन तत्वानुसार भरण्यात येणार असून सदरील नियुक्ती आदेश हे निर्गमित केलेल्या तारखेपासुन ते 11 महिने 29 दिवस पर्यंतच्या कालावधीकरिता भरण्यात येणार आहेत. पुढील पुनर्नियुक्ती आपल्या कामगिरी मुल्यांकनावर आधरित असेल.
  6. वरील नमुद पदे ही राज्य शासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत. सदर पदावर शासकीय सेवेप्रमाणे असलेले नियम अटी व शर्ती याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही तसेच यापदासाठी शासनाचे सेवानियम लागू नाहीत.(NHM Nagpur Bharti 2025)
  7. अर्जदार हा संबधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदारा विरुध्द् कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
  8. अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचेसोईनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणीकरता येणार नाही.
  9. अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांच्या सध्या सुरु असलेला मोबाईलनंबर व ई-मेलआयडी अचूक नोंदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्णहोईपर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी.
  10. भरती प्रक्रियेदरम्यान ज्या-ज्या उमेदवारांना बोलविण्यात येईल, त्या-त्या वेळी त्यांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. तसेच सदर उपस्थितीकरीता कोणतेही मानधन अथवा प्रवास खर्च देव राहणार नाही.
  11. अर्जाचा नमुना हा जाहिराती सोबत प्रसिध्द करण्यात आलेला असून, सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास उमेदवारांचा अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही.
  12. उमेदवारांचा अर्ज अपुर्ण व अर्धवट भरलेला असल्याने नाकारला गेल्यास सर्वस्वी जबाबदारी हीउमेदवारांची राहील याबाबत उमेदवारांना तक्रार करता येणार नाही
  13. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
💁‍♀️Panvel Mahanagarpalika Bharti 2025: पनवेल महानगरपालिका अंतर्गत नवीन 52 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

1 thought on “NHM Nagpur Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपुर अंतर्गत 53 जागांसाठी भरती 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo