NHM Gadchiroli Bharti 2026: आरोग्य क्षेत्रात नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), १५ व्या वित्त आयोग आणि मोबाईल मेडिकल युनिट अंतर्गत गडचिरोली जिल्हा साठी विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून. इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून यामध्ये जवळपास 172 रिक्त जागांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत, पात्रताधारक उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. या भरतीचे अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 20 जानेवारी 2026 पर्यंत सादर करण्यास उमेदवारांना आवाहन केले आहे. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी.
NHM Gadchiroli Bharti 2026
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन गूगल फॉर्म पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 172 पदे
- पदाचे नाव : “विशेषज्ञ, सुपर स्पेशालिस्ट, स्टाफ नर्स, समुपदेशक, लेखापाल, तालुका गट संयोजक, सांख्यिकी सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, एक्स-रे तंत्रज्ञ, दंत आरोग्यतज्ञ, दंत तंत्रज्ञ आणि इतर अनेक” पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे
- शैक्षणिक पात्रता : पदनिहाय शैक्षणिक पात्रतेसाठी PDF जाहिरात पहावी.
NHM Gadchiroli Bharti 2026
- भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
- नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरती नोकरी मिळवण्याची चांगली संधी.
- नोकरीचे ठिकाण : गडचिरोली (महाराष्ट्र)
महत्त्वाच्या तारखा
| अर्ज सुरू | 9 जानेवारी 2026 पासून |
| अंतिम तारीख | 20 जानेवारी 2026 पर्यंत |
| मुलाखत (Interview) | नंतर कळविण्यात येईल |
[Disclaimer : सदर भरती ची जाहिरात ही राष्ट्रीय आरोग्य अभियान अगडचिरोली जिल्हाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | मुलाखत (Interview) |
| दुसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
- वयोमर्यादा (Age Limit) : खुल्या गटातील उमेवारांसाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्षे व राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी कमाल 43 वर्षे देण्यात आलेली आहे.
- मासिक वेतन (Salary): दरमहा 17,000 ते 1,25,,000 रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
- अर्ज शुल्क (Fee ) : सर्व उमेदवारांसाठी : 100/- रुपये
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
NHM Gadchiroli Bharti 2026
महत्त्वाची सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील दिलेल्या दिनांक 20 जानेवारी 2026 च्या आत अर्ज सादर करण्यास सांगितले आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी व मोबाईल नंबर वैध राहणे आवश्यक राहील.
- शासकीय, निमशासकीय, खाजगी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असणा-या संबंधित अनुभवाचाच विचार निवड प्रक्रियेत करण्यात येईल. ज्या पदाकरिता अर्ज केला आहे त्याच पदाचा असलेला अनुभव ग्राहय धरण्यात येईल.
- वरिल पदे ही कंत्राटी स्वरुपाची व एकत्रित मानधन तत्वानुसार भरण्यात येणार असून सदरील नियुक्ती आदेश हे निर्गमित केलेल्या तारखेपासुन ते 11 महिने 29 दिवस पर्यंतच्या कालावधीकरिता भरण्यात येणार आहेत. पुढील पुनर्नियुक्ती आपल्या कामगिरी मुल्यांकनावर आधरित असेल.
- वरील नमुद पदे ही राज्य शासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत. सदर पदावर शासकीय सेवेप्रमाणे असलेले नियम अटी व शर्ती याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही तसेच यापदासाठी शासनाचे सेवानियम लागू नाहीत.
- अर्जदार हा संबधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदारा विरुध्द् कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
- अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचेसोईनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणीकरता येणार नाही.
- अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांच्या सध्या सुरु असलेला मोबाईलनंबर व ई-मेलआयडी अचूक नोंदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्णहोईपर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी.
- भरती प्रक्रियेदरम्यान ज्या-ज्या उमेदवारांना बोलविण्यात येईल, त्या-त्या वेळी त्यांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. तसेच सदर उपस्थितीकरीता कोणतेही मानधन अथवा प्रवास खर्च देव राहणार नाही.
- अर्जाचा नमुना हा जाहिराती सोबत प्रसिध्द करण्यात आलेला असून, सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास उमेदवारांचा अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही.
- उमेदवारांचा अर्ज अपुर्ण व अर्धवट भरलेला असल्याने नाकारला गेल्यास सर्वस्वी जबाबदारी हीउमेदवारांची राहील याबाबत उमेदवारांना तक्रार करता येणार नाही
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
Assam Rifles Sports Quota Bharti 2026 | 10वी पास खेळाडूंकरिता जनरल ड्युटी पदासाठी भरती 2026
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा
1 thought on “NHM Gadchiroli Bharti 2026: 172 पदांची मोठी भरती, 12वी पास ते पदवीध उमेदवारांसाठी सुवर्णसंधी”