NHM Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025:आरोग्य क्षेत्रात नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत छ. संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून. इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे, या भरतीमध्ये MPW, स्टाफ नर्स पदे भरण्यात येणार असून पात्रताधारक उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. या भरतीचे अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत सादर करण्यास उमेदवारांना आवाहन केले आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!
NHM Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 036 पदे
- पदाचे नाव : स्टाफ नर्स व MPW पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- शैक्षणिक पात्रता : 12वी/GNM/ANM/पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक.
पदांचा तपशील
| पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | स्टाफ नर्स | 24 |
| 2. | MPW | 12 |
| एकुण | 036 |
- भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान छ. संभाजीनगर महानगरपालिका यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
- नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरती
- नोकरीचे ठिकाण : छ. संभाजीनगर जिल्हा (महाराष्ट्र)
महत्त्वाच्या तारखा
| अर्ज सुरू तारीख | 31 ऑक्टोंबर 2025 पासून |
| अर्जाची अंतिम तारीख | 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत |
| मुलाखत (Interview) | नंतर कळविण्यात येईल |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही छ. संभाजीनगर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | गुणवत्ता यादी |
| दुसरा टप्पा | मुलाखत (Interview) |
| तिसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
- वयोमर्यादा (Age Limit) : खुल्या गटातील उमेवारांसाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्षे व राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी कमाल 43 वर्षे देण्यात आलेली आहे.
- मासिक वेतन : दरमहा 18,000 ते 20,000 रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
अर्ज शुल्क
| श्रेणी | शुल्क |
| अमागासवर्गीय उमेदवारांसाठी | 550/- रुपये |
| मागासवर्गीय उमेदवारांसाठी | 250/- रुपये |
अर्ज पाठवण्याचा पत्ता : डाटा सेंटर, सिटी माव्हेल बिल्डींग निराला बाजार, S.B. कॉलेज बस स्टॉप शेजारी छत्रपती संभाजीनगर
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| अर्ज नमुना | येथे क्लिक करा |
NHM Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील दिलेल्या पत्त्यावरती दिनांक 10 नोव्हेंबर 2025 च्या आत आलेले अर्ज ग्राह्य धरले जातील.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी व मोबाईल नंबर वैध राहणे आवश्यक राहील.
- शासकीय, निमशासकीय, खाजगी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असणा-या संबंधित अनुभवाचाच विचार निवड प्रक्रियेत करण्यात येईल. ज्या पदाकरिता अर्ज केला आहे त्याच पदाचा असलेला अनुभव ग्राहय धरण्यात येईल.
- वरिल पदे ही कंत्राटी स्वरुपाची व एकत्रित मानधन तत्वानुसार भरण्यात येणार असून सदरील नियुक्ती आदेश हे निर्गमित केलेल्या तारखेपासुन ते 11 महिने 29 दिवस पर्यंतच्या कालावधीकरिता भरण्यात येणार आहेत. पुढील पुनर्नियुक्ती आपल्या कामगिरी मुल्यांकनावर आधरित असेल.
- अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांचा सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचुक नोंदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहतील याची दक्षता घ्यावी.
- वरील नमुद पदे ही राज्य शासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत. सदर पदावर शासकीय सेवेप्रमाणे असलेले नियम अटी व शर्ती याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही तसेच यापदासाठी शासनाचे सेवानियम लागू नाहीत.
- केंद्र/राज्य शासनाने संबंधित पदे नामंजूर केल्यास उमेदवाराची सेवा कोणतीही पूर्वसूचना न देता तात्काळ समाप्त करण्यात येईल.
- अर्जदार हा संबधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदारा विरुध्द् कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
- अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचेसोईनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणीकरता येणार नाही.(NHM Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025)
- अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांच्या सध्या सुरु असलेला मोबाईलनंबर व ई-मेलआयडी अचूक नोंदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्णहोईपर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी.
- भरती प्रक्रियेदरम्यान ज्या-ज्या उमेदवारांना बोलविण्यात येईल, त्या-त्या वेळी त्यांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. तसेच सदर उपस्थितीकरीता कोणतेही मानधन अथवा प्रवास खर्च देव राहणार नाही.
- अर्जाचा नमुना हा जाहिराती सोबत प्रसिध्द करण्यात आलेला असून, सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास उमेदवारांचा अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही.
- उमेदवारांचा अर्ज अपुर्ण व अर्धवट भरलेला असल्याने नाकारला गेल्यास सर्वस्वी जबाबदारी हीउमेदवारांची राहील याबाबत उमेदवारांना तक्रार करता येणार नाही
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
RRB NTPC Recruitment 2025:भारतीय रेल्वे विभागामध्ये 3058 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा