NHM Buldhana Bharti 2025:आरोग्य क्षेत्रात नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बुलढाणा अंतर्गत कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर 87 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून. इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे, पात्रताधारक उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. या भरतीचे अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत सादर करण्यास उमेदवारांना आवाहन केले आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!
NHM Buldhana Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 087 पदे
- पदाचे नाव : विविध पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- शैक्षणिक पात्रता : पदनिहाय शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी मुळ जाहिरात PDF स्वरूपात दिली आहे ती पहा.
- भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान बुलढाणा यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
- नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरती
- नोकरीचे ठिकाण : बुलढाणा जिल्हा (महाराष्ट्र)
महत्त्वाच्या तारखा
| अर्ज सुरू तारीख | 4 नोव्हेंबर 2025 पासून |
| अर्जाची अंतिम तारीख | 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत |
| मुलाखत Interview | नंतर कळविण्यात येईल |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही बुलढाणा जिल्हाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | लेखी परिक्षा |
| दुसरा टप्पा | मुलाखत (Interview) |
| दुसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
- वयोमर्यादा (Age Limit) : खुल्या गटातील उमेवारांसाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्षे व राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी कमाल 43 वर्षे देण्यात आलेली आहे.
- मासिक वेतन : दरमहा 20,000 ते 35,000 रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
अर्ज शुल्क
| श्रेणी | शुल्क |
| अमागासवर्गीय उमेदवारांसाठी | 300/- रुपये |
| मागासवर्गीय उमेदवारांसाठी | 250/- रुपये |
[टीप:सदरील शुल्क हे डिमांड ड्राफ्ट (Demand Draft) स्वरुपात स्वीकारण्यात येईल.]
अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, बुलडाणा.
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| अर्ज नमुना | येथे क्लिक करा |
NHM Buldhana Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील दिलेल्या पत्त्यावरती दिनांक 18 नोव्हेंबर 2025 च्या आत आलेले अर्ज ग्राह्य धरले जातील.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी व मोबाईल नंबर वैध राहणे आवश्यक राहील.
- वरिल पदे ही कंत्राटी स्वरुपाची व एकत्रित मानधन तत्वानुसार भरण्यात येणार असून सदरील नियुक्ती आदेश हे निर्गमित केलेल्या तारखेपासुन ते 11 महिने 29 दिवस पर्यंतच्या कालावधीकरिता भरण्यात येणार आहेत. पुढील पुनर्नियुक्ती आपल्या कामगिरी मुल्यांकनावर आधरित असेल.(NHM Buldhana Bharti 2025)
- वरील नमुद पदे ही राज्य शासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत. सदर पदावर शासकीय सेवेप्रमाणे असलेले नियम अटी व शर्ती याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही तसेच यापदासाठी शासनाचे सेवानियम लागू नाहीत.
- अर्जदार हा संबधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदारा विरुध्द् कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
- खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांनी रुपये ३०० व राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी रुपये २५० चा डिमांड ड्राफ जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्यण सोसायटी, बुलडाणा (district integrated health and family welfare society, Buldana) यांचे नावाने काढावा.
- भरती प्रक्रियेदरम्यान ज्या-ज्या उमेदवारांना बोलविण्यात येईल, त्या-त्या वेळी त्यांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. तसेच सदर उपस्थितीकरीता कोणतेही मानधन अथवा प्रवास खर्च देव राहणार नाही.
- अर्जाचा नमुना हा जाहिराती सोबत प्रसिध्द करण्यात आलेला असून, सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास उमेदवारांचा अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये नवीन 434 जागांसाठी लेखनिक” पदांच्या भरती जाहीर 2025: Pune DCC Bank Recruitment 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा