राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025 | NHM Alibag Bharti 2025

NHM Alibag Bharti 2025:तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का ? कारण राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अलिबाग रायगड या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्याची 38 रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. तुम्ही जर या भरतीसाठी इच्छुक असाल तर हि जाहिरात तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. कारण राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2025 अलिबाग रायगड साठी ची अधिकृत जाहिरात ही नुकतीच प्रसिद्ध केलेली आहे, पात्रताधारक उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. या भरतीचे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरायचे असून दिनांक 10 सप्टेंबर 2025 पासून सुरू झालेले आहेत. आणि पात्र उमेदवारांची निवड हि थेट मुलाखती द्वारे होणार असून त्यासाठी उमेदवारांना दर महिन्याच्या 05 व 20 तारखेला मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे, इच्छुक उमेदवारांनी या संधीचा नक्की फायदा करून घ्या!

NHM Alibag Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : 038
    पदाचे नाव :   वैद्यकीय अधिकारी (MBBS) पदासाठी जाहिरात
  • शैक्षणिक पात्रता : एम बी बी एस आणि एम एम सी रजिस्ट्रेशन (मूळ जाहिरात वाचा)

◾पदांचा तपशील

अ. क्रं. प्रवर्ग पद संख्या
1. अ.जाती 04
2. अ.जमाती 04
3. भ.ज.ब 01
4. भ.ज.क 02
5. भ.ज.ड 01
6. इमाव 08
7. एसईबीसी 04
8. ईडब्लूएस 04
9. खुला 10
TOTAL 038
  • भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान अलिबाग रायगड यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरती
  • मासिक वेतन : दरमहा रु. 60,000/- पर्यंत मासिक मानधन
  • नोकरीचे ठिकाण : अलिबाग, रायगड (महाराष्ट्र)

◾महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू तारीख 10 सप्टेंबर 2025 रोजी
मुलाखतीची तारीख दर महिन्याच्या 05 व 20 तारखेला मुलाखत

[टीप – रिक्त पदे भरेपर्यंत दर महिन्याच्या 05 व 20 तारखेला सकाळी 10:00 ते दुपारी 12:00 वेळेमध्ये (सदर दिवशी सु‌ट्टी असल्यास पुढील कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी]

[ अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही राष्ट्रीय आरोग्य अभियान अलिबागच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

◾निवड प्रक्रिया (Selection Process)

पहिला टप्पा मुलाखत (Interview)
दुसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
  • वयोमर्यादा (Age Limit) : कमाल वयोमर्यादा 70 वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • मुलाखतीस उपस्थित पत्ता : मुलाखतीची पत्ता: राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रुम नं. २१४, जिल्हा रुग्णालय अलिबाग.

◾महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अर्ज नमुना येथे क्लिक करा
जाहिरात PDF पहा येथे क्लिक करा

NHM Alibag Bharti 2025

⚠️उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना

  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील दिलेल्या पत्त्यावरती अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑफलाईन अर्ज सादर करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर जर असे आढळून आले की उमेदवार पात्रता निकषांची पूर्तता करत नाही आणि/किंवा त्याने कोणतीही चुकीची/खोटी माहिती/प्रमाणपत्र/कागदपत्रे सादर केली आहेत किंवा कोणतीही महत्त्वाची वस्तुस्थिती लपवली आहे, तर त्याची/तिची उमेदवारी रद्द केली जाईल.
  5. सदर पदे राज्य शासनाची नियमित पदे नसुन निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत. सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही तसेच या पदांसाठी शासनाचे सेवा नियम लागु नाही. तसेच अर्जदाराला शासकीय सेवेत सामावुन घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही.
  6. राष्ट्रीय आरोग्य अभियान मधुन कोणत्याही संस्थास्तरावरुन एखादया कर्मचा-यांच्या अकार्यक्षमता अनियमितेच्या कारणामुळे सेवा समाप्त करण्यात आल्या असतील तर त्या कर्मचा-यास या पुढे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कोणत्याही पदाकरिता विचार केला जाणार नाही
  7. अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा व अर्जदारा विरुध्द कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झाला नसावा
  8. शासकीय, निमशासकीय, खाजगी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असणा-या संबंधित अनुभवाचाच विचार निवड प्रक्रियेत करण्यात येईल. ज्या पदाकरिता अर्ज केला आहे त्याच पदाचा असलेला अनुभव ग्राहय धरण्यात येईल.
  9. वरिल पदे ही कंत्राटी स्वरुपाची व एकत्रित मानधन तत्वानुसार भरण्यात येणार असून सदरील नियुक्ती आदेश हे निर्गमित केलेल्या तारखेपासुन ते दिनांक. 26/06/2026 पर्यंतच्या कालावधीकरिता भरण्यात येणार आहेत. पुढील पुनर्नियुक्ती आपल्या कामगिरी मुल्यांकनावर आधरित असेल.
  10. सदर जाहिरातीस अनुसरुन ज्या उमेदवारांचे अर्ज विहित मुदतीत प्राप्त होतील केवळ अशाच उमेदवरांचे अर्ज विचारात घेतले जातील. अन्य कोणत्याही संदर्भातील यापूर्वी या कार्यालयास प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही
  11. केंद्र शासनाने संबंधित पदे नामंजुर केल्यास उमेदवाराची सेवा कोणतीही पुर्व सुचना न देता तात्काळ समाप्त करण्यात येईल.
  12. उमेदवारांनी अर्ज करित असलेल्या पदाचे नाव व स्वतःच्या जातीचा प्रवर्ग अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करावा. जर एकापेक्षा अधिक पदांकरिता अर्ज करावयाचा असल्यास उमेदवारांनी प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र अर्ज सादर करावेत. तसेच ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्याच पदासाठी अर्ज ग्राहय धरला जाईल. तसेच कार्यक्रमाचे नाव स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे.(NHM Alibag Bharti 2025)
  13. अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांचा सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचुक नोंदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहतील याची दक्षता घ्यावी.
  14. ज्या उमेदवाराना ग्रेड सिस्टीम / CGPA नुसार गुण मिळालेले आहेत त्यांनी अंतिम वर्षाच्या गुणांची टक्केवारी तसेच त्यांच्या विद्यापीठानुसार टक्केवारी काढण्याचे सूत्र अर्जामध्ये नमुद करावे. सदर माहिती न दिल्यास गुण दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
  15. दि. 23/07/2022 च्या पत्रानुसार दोन पेक्षा अधिक हयात मुले असणा-या उमेदवारांचे अर्ज पात्र केले जाणार नाही. सोबत जोडण्यात आलेला नमुना भरुन अजर्जासोबत जोडणे बंधनकराक राहील.
  16. उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात PDF स्वरूपातील पहावी.

हि जाहिरात पण पहा 👇
धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य गट ब आणि गट क पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध | Dharmaday Ayukt Maharashtra Rajya Bharti 202

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

1 thought on “राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025 | NHM Alibag Bharti 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo