Navin Mumbai Mahanagarpalika Bharti 2025:नवी मुंबई महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत भरती प्रक्रिया मोहीम राबवण्यात करिता पात्र उमेदवारांकडून करारतत्वाव निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्वावर कंत्राटी पध्दतीने रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांची निवड करणेकामी नमुंमपा जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीमध्ये पाच वेगवेगळ्या जवळपास 30 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, आणि वेगवेगळ्या पदासाठी पदानुसार पात्रता मागवण्यात आलेली आहे.(Navin Mumbai Mahanagarpalika Bharti 2025) पात्र उमेदवारांनी जाहिरातीत पदापुढे नमूद केलेली शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी. अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने मागवण्यात आलेले आहेत आणि त्यासाठी अंतिम दिनांक हा 11 सप्टेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेले आहे.
Navin Mumbai Mahanagarpalika Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 030 रिक्त पदे
पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ, वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ, स्टाफ नर्स, ए.एन.एम, औषधनिर्माता
पदांचा तपशील :
| पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ | 10 |
| 2. | वैद्यकीय अधिकारी | बिंदू ना.लागू नाही. |
| 3. | स्टाफ नर्स | 06 |
| 4. | ए.एन.एम. | 10 |
| 5. | औषध निर्माता | 03 |
| TOTAL | 030 |
महत्त्वाच्या तारखा :
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज सुरूः 26 ऑगस्ट 2025 पासून
- अर्जाची शेवटची तारीखः 11 सप्टेंबर 2025 पर्यंत
- भरती विभाग : नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- नोकरी प्रकार : मानधन तत्वावरती (कंत्राटी)
- नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र (महाराष्ट्र)
मुलाखत व अर्ज पाठविण्याचा पत्ता :
- आरोग्य विभाग, 3 रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, प्लॉट नं.1, से. 15 ओ, किल्लेगावठाण जवळ, सी बी. डी. बेलापूर, नवी मुंबई 400614
Navin Mumbai Mahanagarpalika Bharti 2025
शैक्षणिक पात्रता :
| पद क्रं | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| 1. | वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ | एम.बी.बी.एस. पदवी. |
| 2. | वैद्यकीय अधिकारी | एम.बी.बी.एस. पदवी. |
| 3. | स्टाफ नर्स | 12वी/ B.sc नरसिंग |
| 4. | ए. एन. एम. | 10वी/ANM कोर्स |
| 5. | औषध निर्माता | 12वी/डी-फार्मसी/बी-फार्मसी |
(अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
- अर्ज शुल्क (Fee) : शुल्क नाही
- मासिक वेतन (Salary ) : मासिक वेतन हे प्रत्येक पदाच्या पात्रतेनुसार वेगवेगळे देण्यात आलेले आहे. (मूळ जाहिरात पीडीएफ पहा)
वयोमर्यादा (Age Limit): 26 ऑगस्ट 2025 रोजी
- उमेदवारांचे वय खुल्या गटातील 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
- राखीव गटातील उमेदवारांसाठी 43 वर्षापेक्षा जास्त नसावे.
निवड प्रक्रिया (Selection Process) : थेट मुलाखतीद्वारे (Interview)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 11 सप्टेंबर 2025 पर्यंत
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| जाहिरात pdf पहा | येथे क्लिक करा |
Navin Mumbai Mahanagarpalika Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- वैद्यकीय अधिकारी पदांकरीता निवड पद्धत हि मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे.
- अर्ज सादर करीत असतांना आवश्यक सर्व शैक्षणिक, अनुभव, जात इ. दाखले, प्रमाणपत्राच्या स्वयंसाक्षांकित सुस्पष्ठ छायांकित प्रती जोडाव्यात.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- अपूर्ण माहिती भरलेले व आवश्यक कागदपत्रे नसलेले अर्ज ग्राहय धरले जाणार नाहीत.
- उमेदवारांस मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यास मराठी लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
- राखीव प्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध न झाल्यास इतर प्रवर्गातील उमेदवारांना तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देण्यात येईल, त्यामुळे सर्व प्रवर्गातील पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत.
- दिलेल्या कालावधीत अर्ज न पोहोचल्यास अर्ज बाद करण्यात येतील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचा(Navin Mumbai Mahanagarpalika Bharti 2025)निर्णय अंतिम असेल.
- जर अर्जदार पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- मुलाखतीसाठी व कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- सदर भरतीच्या पदांकरिता मुलाखती ही दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि पण जाहिरात पहा👇
इंटेलिजन्स ब्युरो भरती नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025 | Intelligence Bureau Bharti 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा
2 thoughts on “नवी मुंबई महानगरपालिका भरती नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025 | Navin Mumbai Mahanagarpalika Bharti 2025”