नेव्हल डॉकयार्ड मुंबई अप्रेंटिस भरती प्रसिद्ध | Naval Dockyard Mumbai Apprentice Requirement 2025

Naval Dockyard Mumbai Apprentice Requirement 2025 : भारतीय नेवीचा भाग बनण्याची नेव्हल डॉकयार्ड मुंबई यांच्या अंतर्गत अप्रेंटिस भरती २०२५ ची अधिकृत घोषणा केली आहे, या भरती मोहिमे अंतर्गत 286 उमेदवारांचे इंडीयन नेविचा भाग बनण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे ही एक चांगली करिअरची सुरुवात करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे. या भरती मोहिमेचे उद्दिष्ट विविध आयटीआय आणि नॉन-आयटीआय अप्रेंटिस ट्रेडसाठी रिक्त जागा भरण्यासाठी आहे. यशस्वी उमेदवारांना एका संरचित अप्रेंटिसशिप प्रोग्रामचा फायदा होईल, पात्र उमेदवारांनी (Naval Dockyard Mumbai Apprentice Requirement 2025) जाहिरातीत पदापुढे नमूद केलेली शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी. अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आलेले आहेत आणि त्यासाठी अंतिम दिनांक हा 16 सप्टेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेले आहे. पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Naval Dockyard Mumbai Apprentice Requirement 2025

अर्ज स्विकारण्याची पद्धत :  ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
एकूण पदसंख्या : 0286 पदे
पदाचे नाव :  ITI & Non-ITI  अप्रेंटिस
मासिक वेतन (Salary ) : अप्रेंटिस कायदा 1961 नुसार देण्यात येईल
शैक्षणिक पात्रता:-
आयटीआय ट्रेड: उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (NCVT/SCVT) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
नॉन-आयटीआय ट्रेड (क्रेन ऑपरेटर): इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
नॉन-आयटीआय ट्रेड (रिगर): इयत्ता 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

ट्रेड क्रं. ट्रेडचे नाव  ट्रेड संख्या
1. ॲडव्हान्स मेकॅनिक 02
2. कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट 04
3. इलेक्ट्रिशियन 37
4. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 21
5. फिटर 03
6. फाउंड्री मॅन 02
7. I & CTSM 01
8. इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 04
9. मेकॅनिस्ट 02
10. मरीन इंजिन फिटर 10
11. मेसन 17
12. मेकॅनिक (सेंट्रल AC )इ. 09
13. मेकॅनिक (एमबीडेड सिस्टम अँड पी एल सी) 01
14. मेकॅनिक (मोटर वेहिकल) 03
15. मेकॅनिक डिझेल 26
16. मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स 07
17. मेकॅनिक (MTM) 06
18. मेकॅनिक (Ref&S) 11
19. ऑपरेटर ऍडव्हान्स मशीन टूल 05
20. पेंटर (G) 02
21. पॅटर्न मेकर 05
22. पाईप फिटर 01
23. सीट मेटल वर्कर 01
24. शिफ्ट राईट स्टील 09
25.  शिफ्ट राईट वूड 02
26. Tig/Mig वेल्डर 07
27. वेल्डर (G&E) 21
28. वेल्डर पाईप अँड प्रेशर वेसल्स 11
29. क्रेन ऑपरेटर ओव्हरहेड (SI) 19
30  रिगर 09
TOTAL  0286

Naval Dockyard Mumbai Apprentice Requirement 2025

महत्त्वाच्या तारखा :

  1. ऑनलाइन अर्ज सुरूः 26 ऑगस्ट 2025 पासून
  2. अर्जाची शेवटची तारीखः  16 सप्टेंबर 2025 पर्यंत
  3. ऑनलाईन (CBT)परीक्षेची तारीख :- ऑक्टोंबर 2025  संभाव्य
  4. प्रशिक्षणाची तारीख: 01 डिसेंबर 2025

भरती विभाग :  नेव्हल डॉकयार्ड मुंबई यांच्या अंतर्गत अप्रेंटिस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
भरती श्रेणी :  अप्रेंटिस
नोकरीचे ठिकाण: नेव्हल डॉकयार्ड मुंबई कार्यक्षेत्र (महाराष्ट्र)

(अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

अर्ज शुल्क (Fee) :  शुल्क नाही
मासिक वेतन (Salary ) : वेतन हे प्रत्येक पदाच्या पात्रतेनुसार वेगवेगळे आहे. त्यामुळे सविस्तर वेतन श्रेणी ही PDF मध्ये देण्यात आलेले आहे.

वयोमर्यादा (Age Limit):

  • धोकादायक नसलेल्या ट्रेड साठी १४ वर्षे पर्यंत किमान असावे
  • धोकादायक व्यवसायांसाठी १८ वर्षे पेक्षा जास्त असावे.
  • ३० नोव्हेंबर २०११ रोजी किंवा त्यापूर्वी जन्मलेले उमेदवार धोकादायक नसलेल्या ट्रेडसाठी पात्र आहेत.
  • ३० नोव्हेंबर २००७ रोजी किंवा त्यापूर्वी जन्मलेले उमेदवार धोकादायक ट्रेडसाठी पात्र आहेत.

निवड प्रक्रिया (Selection Process) :
लेखी परीक्षा पद्धतीने (CBT)
कागदपत्र पडताळणी

ऑनाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 09 सप्टेंबर 2025 पर्यंत

अधिकृत संकेतस्थळ  येथे क्लिक करा 
जाहिरात pdf पहा  येथे क्लिक करा 

Naval Dockyard Mumbai Apprentice Requirement 2025

या पद्धतीने अर्ज करा:-

  1. अधिकृत अर्ज पोर्टलला भेट द्या. (लिंक खाली दिली आहे)
  2. नेव्हल डॉकयार्ड मुंबई अप्रेंटिस भरती २०२५ साठी लिंकवर क्लिक करा.
  3. तुमचे नाव, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर यासारखी मूलभूत माहिती देऊन नोंदणी करा.
  4. नोंदणी क्रेडेन्शियल्स वापरून लॉग इन करा.
  5. तुमचे शिक्षण, वैयक्तिक माहिती आणि व्यापार प्राधान्य यांबाबत अचूक माहितीसह ऑनलाइन अर्ज भरा.
  6. निर्दिष्ट स्वरूप आणि आकारानुसार आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.
  7. सर्व तपशील बरोबर आहेत याची खात्री करण्यासाठी अर्ज काळजीपूर्वक तपासा.
  8. अंतिम अर्ज सादर करा.
  9. तुमच्या नोंदींसाठी सादर केलेल्या अर्जाची प्रिंटआउट घ्या.

Naval Dockyard Mumbai Apprentice Requirement 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :-

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
  • इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे

हि पण जाहिरात पहा 👇

थेट मुलाखत | सोलापूर महानगरपालिका नवीन जाहिरात प्रसिद्ध : Solapur Mahanagar Palika Bharti 2025

हि जाहिरात तुमचे नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना शेअर करा

2 thoughts on “नेव्हल डॉकयार्ड मुंबई अप्रेंटिस भरती प्रसिद्ध | Naval Dockyard Mumbai Apprentice Requirement 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo