National Health Mission Ratnagiri Bharti 2025:नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी परभणी अंतर्गत 12 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून. पात्रताधारक उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. उमेदवारांची निवड हि थेट गुणांक पद्धतीद्वारे होणार असून या भरती मोहिमेमध्ये कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा नाही. या भरतीचे अर्ज हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरायचे असून त्याचा अंतिम दिनांक 26 सप्टेंबर 2025 पर्यंत देण्यात आला आहे. प्रस्तुत भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि अटी अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आले आहेत. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी!
National Health Mission Ratnagiri Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 012
- पदाचे नाव : जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा साथीचे रोग तज्ञ, जिल्हा सल्लागार-एनटीसीपी, सीपीएचसी सल्लागार आणि सार्वजनिक आरोग्य तज्ञ.
- शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस/एमपीएच/एमएचए/एमबीए आरोग्य + अनुभवासह कोणताही वैद्यकीय पदवीधर (मूळ जाहिरात वाचा)
पदांचा तपशील
| पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | Public Health Specialist | 01 |
| 2. | District Epidemiologists | 01 |
| 3. | District Consultant-NTCP | 01 |
| 4. | CPHC Consultant | 01 |
| 5. | Public Health Specialist | 08 |
| TOTAL | 012 |
- भरती विभाग : जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी रत्नागिरी अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
- नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरती
- मासिक वेतन : दरमहा 35,000 रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
- नोकरीचे ठिकाण : रत्नागिरी (महाराष्ट्र)
महत्त्वाच्या तारखा
| अर्ज सुरू तारीख | 15 सप्टेंबर 2025 रोजी |
| अर्जाची अंतिम तारीख | 26 सप्टेंबर 2025 सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत. |
[ अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटीरत्नागिरीच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
अर्ज शुल्क
| अराखीव प्रवर्गासाठी | 150/- रुपये |
| राखीव प्रवर्गासाठी | 100/- रुपये |
वयोमर्यादा (Age Limit) : 26 सप्टेंबर 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे व कमाल वयोमर्यादा पेक्षा जास्त नसावे. खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्ष देण्यात आली आहे व राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी कमाल 43 वर्षे देण्यात आलेली आहे.
- निवड प्रक्रिया : निवड पद्धती गुणवत्तेच्या आधारे होणार आहे.
- अर्ज सादर करण्याचा ठिकाण : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा रत्नागिरी.
अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक : 26 सप्टेंबर 2025 सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| अर्ज नमुना | येथे क्लिक करा |
National Health Mission Ratnagiri Bharti 2025
⚠️उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील दिलेल्या पत्त्यावरती दिनांक 26 सप्टेंबर 2025 च्या आत आलेले अर्ज ग्राह्य धरले जातील.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी व मोबाईल नंबर वैध राहणे आवश्यक राहील.
- भरतीप्रक्रिया स्थगीत करणे, रद्द करणे, पदभरती प्रक्रियेत बदल करणे, पदांच्या संख्येत बदल करण्याचे सर्व अधिकार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी रत्नागिरी यांच्या स्तरावर राखून ठेवण्यात आले आहेत. याबाबत कोणालाही कोणताही दावा करता येणार नाही.
- सदर पदे राज्य शासनाची नियमित पदे नसुन निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत. सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही तसेच या पदांसाठी शासनाचे सेवा नियम लागु नाही. तसेच अर्जदाराला शासकीय सेवेत सामावुन घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही.(National Health Mission Ratnagiri Bharti 2025)
- पदभरती प्रक्रियेकरिता प्रत्येक अर्जाकरिता अराखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु 150/- (अक्षरी रक्कम रु. एकशे पन्नास फक्त) व राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी रू 100/- (अक्षरी रक्कम रु. शंभर रुपये फक्त) चा धनाकर्ष (Demand Draft) जोडणे आवश्यक आहे.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान मधुन कोणत्याही संस्थास्तरावरुन एखादया कर्मचा-यांच्या अकार्यक्षमता/अनियमितेच्या कारणामुळे सेवा समाप्त करण्यात आल्या असतील तर त्या कर्मचा-यास या पुढे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कोणत्याही पदाकरिता विचार केला जाणार नाही
- अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा व अर्जदारा विरुध्द कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झाला नसावा
- शासकीय, निमशासकीय, खाजगी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असणा-या संबंधित अनुभवाचाच विचार निवड प्रक्रियेत करण्यात येईल. ज्या पदाकरिता अर्ज केला आहे त्याच पदाचा असलेला अनुभव ग्राहय धरण्यात येईल.
- वरिल पदे ही कंत्राटी स्वरुपाची व एकत्रित मानधन तत्वानुसार भरण्यात येणार असून सदरील नियुक्ती आदेश हे निर्गमित केलेल्या तारखेपासुन ते 11 महिने 29 दिवस पर्यंतच्या कालावधीकरिता भरण्यात येणार आहेत. पुढील पुनर्नियुक्ती आपल्या कामगिरी मुल्यांकनावर आधरित असेल.
- सदर जाहिरातीस अनुसरुन ज्या उमेदवारांचे अर्ज विहित मुदतीत प्राप्त होतील केवळ अशाच उमेदवरांचे अर्ज विचारात घेतले जातील. अन्य कोणत्याही संदर्भातील यापूर्वी या कार्यालयास प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही
- केंद्र शासनाने संबंधित पदे नामंजुर केल्यास उमेदवाराची सेवा कोणतीही पुर्व सुचना न देता तात्काळ समाप्त करण्यात येईल.
- उमेदवारांनी अर्ज करित असलेल्या पदाचे नाव व स्वतःच्या जातीचा प्रवर्ग अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करावा. जर एकापेक्षा अधिक पदांकरिता अर्ज करावयाचा असल्यास उमेदवारांनी प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र अर्ज सादर करावेत. तसेच ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्याच पदासाठी अर्ज ग्राहय धरला जाईल. तसेच कार्यक्रमाचे नाव स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी अर्ज करीत असलेल्या पदाचे नांव व सामाजिक आरक्षणानुसार सदर पदाकरीता नमुद प्रवर्ग (जातीचा प्रवर्ग), बँकेचे नाव व डिमांड ड्राफ्ट क्रमांक अर्जामध्ये स्पष्टपणे नमुद करावा.
- अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांचा सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचुक नोंदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहतील याची दक्षता घ्यावी.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
National Health Mission Ratnagiri Bharti 2025
हि जाहिरात पण पहा 👇
RRB सेक्शन कंट्रोलर भरती जाहिरात प्रसिद्ध 2025 | RRB Section Controller Bharti 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा
1 thought on “खूशखबर | राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी भरती 2025 | National Health Mission Ratnagiri Bharti 2025”