Nagpur Mahanagar Palika Bharti 2025 : नागपूर महानगरपालिका आस्थापनेवरील गट-क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांच निवड करणेकामी नागपूर महानगर पालिकेने जाहिरात प्रसिद्ध केली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी कळविण्यात येत आहे. या जाहिरातीमध्ये जवळपास 10 वेगवेगळ्या पदांसाठी 174 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आणि वेगवेगळ्या पदासाठी पदानुसार पात्रता मागवण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी जाहिरातीत पदापुढे नमूद केलेली शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी. (Nagpur Mahanagar Palika Bharti 2025) अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आलेले आहेत आणि त्यासाठी अंतिम दिनांक हा 09 सप्टेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेले आहे.पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी.
Nagpur Mahanagar Palika Bharti 2025
अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
एकूण पदसंख्या : 0174 पदे
पदाचे नाव : वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेले आहेत.
शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि प्रत्येक पदांनुसार वेगवेगळी आहे त्यामुळे सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
महत्त्वाच्या तारखा :
- ऑनलाइन अर्ज सुरूः 26 ऑगस्ट 2025 पासून
- अर्जाची शेवटची तारीखः 09 सप्टेंबर 2025 पर्यंत
- शुल्क भरण्याची शेवटची तारीख (ऑनलाइन): 09 सप्टेंबर 2025 पर्यंत
- ऑनलाईन (CBT)परीक्षेची तारीख :- ऑनलाइन परीक्षेची तारीख अधिकृत संकेतस्थळावरती कळविण्यात येईल
| पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | कर संग्राहक | 074 |
| 2. | कनिष्ठ लिपिक | 060 |
| 3. | स्टनोग्राफर | 010 |
| 4. | लेखापाल रोखपाल | 010 |
| 5. | ग्रंथालय सहाय्यक | 008 |
| 6. | विधी सहाय्यक | 006 |
| 7. | हार्डवेअर इंजिनियर | 002 |
| 8. | डेटा मॅनेजर | 002 |
| 9. | सिस्टम ऍनालिस्ट | 001 |
| 10. | प्रोग्रामर | 001 |
| TOTAL | 0174 |
भरती विभाग : नागपूर महानगरपालिका अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
भरती श्रेणी : सरळसेवे मार्फत सरकारी नोकरी मिळण्याची संधी
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूप सरकारी नोकरी
नोकरीचे ठिकाण:- नागपुर महानगर पालिका कार्यक्षेत्र (महाराष्ट्र)
(अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
अर्ज शुल्क (Fee) :
- अमागास प्रवर्ग उमेदवारांसाठी : 1000/- रुपये
- मागास व अनाथ उमेदवारांसाठी : 900/- रुपये
(माजी सैनिक व दिव्यांग उमेदवारांसाठी शुल्क माफ राहील.)
मासिक वेतन (Salary ) : वेतन हे प्रत्येक पदाच्या पात्रतेनुसार वेगवेगळे आहे. त्यामुळे सविस्तर वेतन श्रेणी ही PDF मध्ये देण्यात आलेले आहे.
वयोमर्यादा (Age Limit): 26 ऑगस्ट 2025 रोजी पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 ते 55 वर्ष दरम्यान असावे. (सरकारी नियमांनुसार विविध श्रेणींसाठी वयात सूट देण्यात आली आहे.)
[SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट, दिव्यांग : 7 वर्ष सूट, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त : 7 वर्ष सूट ]
निवड प्रक्रिया (Selection Process) : ऑनलाइन लेखी परीक्षा पद्धतीने (CBT)
ऑनाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 09 सप्टेंबर 2025 पर्यंत
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| जाहिरात pdf पहा | येथे क्लिक करा |
| व्हॉट्सॲप ग्रुप | येथे क्लिक करा |
Nagpur Mahanagar Palika Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- उमेदवारांस मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यास मराठी लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध (Valid) ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी (Mobile No.) असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेची तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पध्दतीने देण्यात येणार असल्याने, भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणांमध्ये वाढ, घट अथवा बदल होण्याची शक्यता आहे.
- कोणत्याही कारणास्तव पदभरती प्रक्रिया स्थगित रह झाल्यास उमेदवारास परीक्षा शुल्क परत करण्यात येणार नाही.
- प्रस्तुत जाहीरातीस अनुसरुन अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता / अनुभव धारण करणे आवश्यक आहे.
- अनुभवाच्या कालावधीची गणना प्रस्तूत जाहीरातीस अनुसरुन अर्ज सादर करण्याकरीता विहित केलेल्या अंतिम दिनांकास करण्यात येईल
- परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-Refundable) आहे. ऑनलाईन शुल्क भरतांना बँकेचे इतर शुल्क उमेदवाराला स्वतः भरावे लागतील.
- उपरोक्त पदावर अंतिम निवड झाल्यावर नियुक्तीनंतर उमेदवाराची जिल्हा शल्य चिकीत्सक, नागपूर यांचेकडून वैद्यकीय तपासणी केली जाईल व त्यामध्ये वैद्यकीयदृष्टया पात्र असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
- भरती प्रक्रियेबाबतचे सर्व अधिकार नियुक्ती प्राधिकारी यांना असून कोणत्याही टप्प्यावर भरती स्थगित किंवा रद्द करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांचेकडे राखून ठेवले आहे.
- उमेदवाराने या भरती प्रकियेसंदर्भातील माहिती व सूचना नागपूर महानगरपालिका संकेतस्थळावर प्रसिध्द होणार असल्याने भरती प्रक्रिया पूर्ण हाईपर्यंत https://nmcnagpur.gov.in वरील संकेतस्थळावर उमेदवारांनी सद्यस्थिती (updates) वेळोवेळी पहावी.
- परीक्षेसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा प्रवास खर्च देय नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील दिलेली जाहिरात pdf सविस्तर वाचवी.
हि जाहिरात पण पहा 👇
मीरा भाईंदर महानगरपालिका नवीन जाहिरात प्रसिद्ध: Mira Bhayandar Mahanagar Palika Bharti 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा
2 thoughts on “नागपूर महानगरपालिका नवीन जाहिरात प्रसिद्ध: Nagpur Mahanagar Palika Bharti 2025”