MPSC BHARTI 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) भरती 2025 : अधिकृतपणे MPSC गट ब भरती 2025 जाहिरात प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये 282 अराजपत्रित पदांसाठी पदवीधर उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य प्रशासनात स्थिर आणि प्रतिष्ठित सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या पदवीधरांसाठी ही एक अत्यंत अपेक्षित आणि खूप चांगली संधी आहे. या भरती मोहिमेचे उद्दिष्ट राज्य कर निरीक्षक (STI) गट ब आणि सहाय्यक विभाग अधिकारी गट ब (ASO) यासारख्या प्रमुख पदांवर भरणे आहे, या नोकरी मध्ये तुम्हाला उत्कृष्ट वेतन पॅकेजेस आणि फायदे देतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ही एक संवैधानिक संस्था आहे जी महाराष्ट्र राज्यातील विविध नागरी सेवा नोकऱ्यांसाठी उमेदवारांची भरती करण्यासाठी जबाबदार आहे. एमपीएससी ग्रुप बी परीक्षा ही सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक आहे, जी प्रभावी प्रशासकीय भूमिकांसाठी दरवाजे उघडते. या भरती मध्ये निवड पद्धत ही सर्व प्रथम संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाते आणि त्यानंतर पात्र उमेदवारांसाठी मुख्य मुख्य परिक्षा घेतली जाते.
या परिक्षेची सविस्तर माहित खालील लेखात दिलेली आहे
MPSC BHARTI 2025
पद आणि पदांचा तपशील:
| पद क्रं. | पदाचे नाव | विभाग | पद संख्या |
| 1. | Assistant Section Officer (ASO) | Maharashtra Public Service Commission | 03 |
| 2. | State Tax Inspector (STI) | Finance Department | 279 |
| TOTAL | 282 | ||
अर्ज स्विकारण्याची पद्धत : पात्र पदवीधर उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर यापूर्वी विहित पध्दतीने नोंदणी केली नसल्यास नोंदणी करुन खाते (Profile) तयार करणे.
एकूण पदसंख्या : 282
पदांचे नाव :
1.राज्य कर निरीक्षक (STI) गट ब
2.सहाय्यक विभाग अधिकारी (ASO) गट ब
MPSC BHARTI 2025 IMPORTANT DATE
1) ऑनलाइन अर्ज सुरूः 01 ऑगस्ट 2025 (दुपारी 2 : 00 वा.)
2) अर्जाची शेवटची तारीखः 21 ऑगस्ट 2025 (रात्री 12 : 59 वा.)
3) शुल्क भरण्याची शेवटची तारीख (ऑनलाइन): 21 ऑगस्ट 2025 29 ऑगस्ट 2025
4) चलनाद्वारे शुल्क भरण्याची शेवटची तारीखः 25 ऑगस्ट 2025
5) पूर्व परीक्षा दिनांक : 09 नोव्हेंबर 2025
6) मुख्य परीक्षा दिनांक : जाहीर करण्यात येईल
भरती विभाग :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे भरती जाहिरात प्रसिद्ध, Maharashtra Public Service Commission (MPSC)
भरती श्रेणी :
सरकारी विभागात चांगल्या दर्जाची नोकरी
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर (शैक्षणिक पात्रता पदाच्या आवाजाचे आवश्यकतेनुसार आहे मूळ जाहिरात वाचावी)
(अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा :
उमेदवारांचे वय हे 18 ते 38 वर्षापर्यंत असावे मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ / खेळाडू 5 वर्ष सूट दिव्यांग उमेदवार 7 वर्ष सूट (दिनांक 1 नोव्हेंबर 2025 पासून)
अर्ज शुल्क :
अराखीव (खुला) – रुपये 393/मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग रुपये 294 /-
परीक्षा शुल्क भरण्याची पद्धत :
1) ऑनलाइन पद्धत
2) ऑफलाईन पद्धत (चलनाद्वारे)
वेतन श्रेणी : एस १५- रुपये ४१,८००/- ते रुपये १,३२,३००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.
नोकरीचे ठिकाण :
महाराष्ट्र राज्यातील विविध विभागांमध्ये नियुक्ती केली जाईल.
निवड प्रक्रिया :
पूर्व परीक्षा (Prelims)
मुख्य परीक्षा (Mains)
मुलाखत (Interview)
(अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.)
IMPORTANT LINK
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| जाहिरात pdf पहा | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :
•या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
•ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
•भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
(Maharashtra Public Service commission requirement 2025)
•भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
•अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
ही जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा👇
1 thought on “महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती | 282 पदासाठी जाहिरात प्रसिद्ध | MPSC BHARTI 2025”