Maharashtra Police Bharti 2025 : महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती होण्याची स्वप्न बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे कारण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यासाठी पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवारांसाठी जवळपास 16,000 रिक्त पदे असल्याने, उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून ही भरती स्थिर आणि सन्मानाची नोकरी शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. तुम्ही जर बारावी उत्तीर्ण असाल तर या भरतीसाठी पात्र आहात, अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला असून, प्रस्तुत भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि अटी सर्व माहिती या लेखात दिली आहे. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी!
Maharashtra Police Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 16,000 पदे
- पदाचे नाव : पोलीस शिपाई,चालक पोलीस शिपाई, कारागृह पोलीस शिपाई, बँड्समन, सशस्त्र पोलीस शिपाई(SRPF) पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- शैक्षणिक पात्रता : उमेदवार कोणत्याही शाखेतून किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पदांचा तपशील
| पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | पोलीस शिपाई | 12,768 |
| 2. | पोलीस शिपाई चालक | 0234 |
| 3. | सशस्त्र पोलीस शिपाई(SRPF) | 2393 |
| 4. | पोलीस शिपाई बँड्समन | 025 |
| 5. | कारागृह पोलीस शिपाई | 580 |
| एकुण | 16000 |
भरती विभाग : महाराष्ट्र पोलिस विभागा अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे
नोकरीचा प्रकार : महाराष्ट्र पोलीस दलात कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
नोकरीचे ठिकाण : विविध जिल्ह्यांसाठी जाहिरात (Maharashtra)
महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाईन अर्ज सुरू | 29 ऑक्टोंबर 2025 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत |
| मैदान चाचणी/लेखी परिक्षा | नंतर कळविण्यात येईल |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही महाराष्ट्र पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | मैदान चाचणी |
| दुसरा टप्पा | ऑफलाईन लेखी परीक्षा |
| तिसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
| चौथा टप्पा | वैद्यकीय तपासणी |
मासिक वेतन (Salary) : बेसिक 21,700/- ते 69,700/- रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
वयोमर्यादा (Age Limit) : 29 ऑक्टोंबर 2025 रोजी
खुल्या प्रवर्गासाठी किमान वय 18 वर्ष व कमाल 28 वर्षे असणे आवश्यक आहे.
मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयात 05 वर्षे सूट असणार आहे.
अर्ज शुल्क
| श्रेणी | शुल्क |
| अमागासवर्गीय उमेदवारांसाठी | 450/- रुपये |
| मागासवर्गीय उमेदवारांसाठी | 300/- रुपये |
Maharashtra Police Bharti 2025
अर्ज करण्याची पद्धत
- सदर भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत त्यासाठी http://policerecruitment2025.mahait.org च्या अधिकृत वेबसाइट वरती क्लिक करा.
- New Registration किंवा “नवीन नोंदणी करा” या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID आणि पासवर्ड टाका.
- नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला User ID आणि Password मिळेल (SMS/Email द्वारे).तुमच्या User ID आणि Password ने लॉगिन करा.
- पोस्ट निवडा: “पोलीस शिपाई” किंवा अन्य पद.
- अर्ज शुल्क भरण्यासाठी पेमेंट गेटवेवर जा.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी तुमचा अर्ज फॉर्म काळजीपूर्वक तपासा.
- फॉर्म सबमिट करा आणि अंतिम अर्जाचा प्रिंटआउट आणि तुमच्या रेकॉर्डसाठी घ्या.
(हे जाणून घ्या! विशेषबाब म्हणून ज्या उमेदवारांचे वयोमर्यादा पोलीस भरती 2025 साठी उलटलेली आहे अशा उमेदवारांना देखील या पोलीस भरती मध्ये एक संधी देण्यात आलेले आहे.)
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
Maharashtra Police Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- भरती प्रक्रिया जिल्ह्यानुसार प्रत्येक जिल्हास्तरावर पार पडेल.
- लेखी परीक्षा- लेखी परीक्षा OMR शीटवर आधारित ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल.
- अर्ज मागवणे, अर्ज छाननी, शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा अशा टप्प्यांनुसार प्रक्रिया होईल.
- “सर्वप्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येईल शारीरिक चाचणी ही 50 गुणांची घेण्यात येईल त्यामध्ये 24 गुण घेणे अनिवार्य राहील अन्यथा लेखी पेपर साठी अपात्र ठरविण्यात येणार (Maharashtra Police Bharti 2025)
- शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल.
- पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत, उमेदवारांना किमान 40% गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी परीक्षा एकूण 100 गुणांची असते आणि त्यात 100 प्रश्न विचारले जातात.
- संपूर्ण प्रक्रियेचे नियोजन व अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण व विशेष विभागांना पोलिस महासंचालकांची मंजुरी असेल.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
💁♂️Mumbai Police Bharti 2025 | मुंबई पोलीस दलात 2459 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा