महाराष्ट्र पोलीस दलात 15631 रिक्त पदांसाठी जाहिरात | Maharashtra Police Bharti 2025

Maharashtra Police Bharti 2025:महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती होण्याची स्वप्न बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाचे बातमी आहे कारण पोलीस भरती 2025 मध्ये पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवारांसाठी मोठ्या प्रमाणात जवळपास तब्बल 15631 रिक्त पदे असल्याने, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी खूप मोठी संधी उपलब्ध होणार आहे, या भरती मध्ये सुमारे 15 हजार 631 पदे भरण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामध्ये 2024-25 च्या पोलिस शिपाई भरती प्रक्रियेस  मान्यता देण्यात आली आहे. या भरतीमध्ये 2022 व 2023 मध्ये ज्या उमेदवारांचे वयोमर्यादा संपलेली आहे अशा उमेदवारांना देखील या भरतीमध्ये त्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Maharashtra Police Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज असणार आहे. (अधिकृत सूचना आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया महाराष्ट्र पोलीस भरती पोर्टलवर दिली जाईल, महाराष्ट्र राज्य पोलीस भरती पोर्टलनुसार. )
  • एकूण पदसंख्या : 15631 पदे
  • पदाचे नाव : पोलीस शिपाई,चालक पोलीस शिपाई, कारागृह पोलीस शिपाई, बँड्समन, सशस्त्र पोलीस शिपाई(SRPF)
  • शैक्षणिक पात्रता : उमेदवार कोणत्याही शाखेतून किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पदांचा तपशीलव

पद क्रं पदाचे नाव पद संख्या
1. पोलीस शिपाई 12399
2. पोलीस शिपाई चालक 0234
3. सशस्त्र पोलीस शिपाई 2393
4. बँड्स मॅन 025
एकुण 15631
  • भरती विभाग : महाराष्ट्र पोलिस विभाग द्वारे ही भरती केली जाणार आहे. भरती प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही (महाराष्ट्र राज्य गृह मंत्रालय अंतर्गत)
  • नोकरीचा प्रकार : महाराष्ट्र पोलीस दलात कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र राज्य (Maharashtra)

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू 25 सप्टेंबर 2025 पासून (अपेक्षित)
अर्जाची शेवटची तारीख उपलब्ध नाही
मैदान चाचणी नोव्हेंबर/डिसेंबर (अपेक्षित)
परीक्षेचे प्रवेश पत्र परीक्षेच्या 07 दिवस आधी कळविण्यात येईल

[हे जाणून घ्या! विशेष तरतुदी- सन 2022 व 2023 मधील पदांसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एकदाच विशेष संधी देण्यात येईल. 2024 व 2025 दरम्यान रिक्त होणारी पदेही(Maharashtra Police Bharti 2025)या भरतीत समाविष्ट करण्यात येणार आहेत.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा मैदान चाचणी
दुसरा टप्पा ऑफलाईन लेखी परीक्षा
तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
चौथा टप्पा वैद्यकीय तपासणी
  • अर्ज शुल्क : खुल्या वर्गासाठी रु. 450/- आणि राखीव वर्गासाठी रु. 350/-.
  • मासिक वेतन (Salary) : बेसिक 21,700/- ते 69,700/- रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : खुल्या प्रवर्गासाठी किमान 18 वर्ष व कमाल 28 वर्षे असते [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे ]
महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जिल्ह्यानुसार रक्त जागा (रिक्त जागेत बदल होऊ शकतो) येथे क्लिक करा

Maharashtra Police Bharti 2025

महत्वाची माहिती
  1. भरती प्रक्रिया जिल्ह्यानुसार प्रत्येक जिल्हास्तरावर पार पडेल.
  2. लेखी परीक्षा- लेखी परीक्षा OMR शीटवर आधारित ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल.
  3. अर्ज मागवणे, अर्ज छाननी, शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा अशा टप्प्यांनुसार प्रक्रिया होईल.
  4. सर्वप्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येईल शारीरिक चाचणी ही 50 गुणांची घेण्यात येईल त्यामध्ये 24 गुण घेणे अनिवार्य राहील अन्यथा लेखी पेपर साठी अपात्र ठरविण्यात येणार (Maharashtra Police Bharti 2025) शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल.
  5. पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत, उमेदवारांना किमान 40% गुण मिळवणे आवश्यक आहे.
  6. लेखी परीक्षा एकूण 100 गुणांची असते आणि त्यात 100 प्रश्न विचारले जातात.
  7. संपूर्ण प्रक्रियेचे नियोजन व अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण व विशेष विभागांना पोलिस महासंचालकांची मंजुरी असेल.
     

हि जाहिरात पण पहा 👇
💁‍♂️बँक ऑफ बडोदा विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध | Bank Of Baroda Recruitment 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा.

2 thoughts on “महाराष्ट्र पोलीस दलात 15631 रिक्त पदांसाठी जाहिरात | Maharashtra Police Bharti 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo