एलआयसी एचएफएल अप्रेंटिस भरती जाहिरात प्रसिद्ध 2025 | LIC Recruitment 2025

LIC Recruitment 2025:तुम्ही नुकतेच पदवीधर परीक्षा पात्र झाले आहात का? कारण पदवीधर उमेदवारांसाठी विमा आणि विमा क्षेत्रात तुमच्या मजबूत करियर घडवण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर हि जाहिरात तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. कारण एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड एलआयसी एचएफएल अप्रेंटिस भरती 2025 ची अधिकृत घोषणा ही नुकतीच केलेली आहे संपूर्ण भारतामध्ये जवळपास 192 नवीन पदवीधर उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.(LIC Recruitment 2025) या भरतीचे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचे असून त्याचा अंतिम दिनांक हा 22 सप्टेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे इच्छुक उमेदवारांनी या संधीचा नक्की फायदा करून घ्या! उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

LIC Recruitment 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत :  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : 0192
  • पदाचे नाव :  अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी UGC/AICTE द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेत पदवी पूर्ण केलेली असावी

🗓️महत्त्वाच्या तारखा 

  1. ऑनलाइन अर्ज सुरूः 02 सप्टेंबर 2025 पासून
  2. अर्जाची शेवटची तारीखः  22 सप्टेंबर 2025 पर्यंत रात्री 23:59 पर्यंत
  3. ऑनलाइन अर्ज शुल्क: 29 सप्टेंबर 2025 पर्यंत.
  4. ऑनलाइन प्रवेश परीक्षा: 01 ऑक्टोंबर 2025 रोजी
  5. कागदपत्र पडताळणी व मुलाखत: 8 ऑक्टोंबर ते 14 ऑक्टोंबर संभाव्य.
  6. जॉइनिंग तारीख: 01 नोव्हेंबर 2025 संभाव्य.
  • भरती विभाग : LIC HFL अप्रेंटिस अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
  • नोकरीचा प्रकार : अप्रेंटिस
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)

(अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही LIC च्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

  • अर्ज शुल्क (Fee) :  General / EWS / OBC : 944/- रुपये ]
    SC / ST / Female : 708/-रुपये / PwBD : 472/- रुपये ]
  • मासिक वेतन (Salary) : मासिक वेतन 12000/- रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 01 सप्टेंबर 2025 रोजी
    सर्वसाधारण उमेदवारांचे वय 20 वर्षे ते 25 वर्ष दरम्यान असावे.

📝निवड प्रक्रिया (Selection Process)

  • पहिला टप्पा : संगणक आधारित परीक्षा (CBT)
  • दुसरा टप्पा : मुलाखत (Interview)
  • तिसरा टप्पा : कागदपत्र पडताळणी

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 22 सप्टेंबर 2025 पर्यंत.

अधिकृत संकेतस्थळ  येथे क्लिक करा 
जाहिरात pdf पहा  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा

LIC Recruitment 2025

💻ऑनलाइन अर्ज नोंदणी पद्धत:

  1. NATS पोर्टलवर नोंदणी करा: पहिले आणि अनिवार्य पाऊल म्हणजे भारत सरकारच्या राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रशिक्षण योजना (NATS) पोर्टलवर स्वतःची नोंदणी करणे. NATS पोर्टलला भेट द्या आणि तुमचे प्रोफाइल तयार करण्यासाठी “विद्यार्थी नोंदणी/लॉगिन” विभागात जा. (अर्ज लिंक दिलेली आहे).
  2. जाहिरात शोधा: NATS पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर, “LICHFL” साठी अप्रेंटिसशिप जाहिरात शोधा.
  3. अर्ज करा आणि तुमचा आयडी नोंदवा: पोर्टलद्वारे संधीसाठी अर्ज करा. भविष्यातील सर्व संपर्कांसाठी NATS पोर्टलद्वारे तयार केलेला तुमचा नोंदणी आयडी नोंदवणे खूप महत्वाचे आहे.
  4. तुमचा ईमेल तपासा: अर्ज केल्यानंतर, तुम्हाला BFSI SSC (info@bfsissc.com) कडून पुढील चरणांबद्दल तपशीलांसह एक ईमेल प्राप्त होईल.
  5. अर्ज शुल्क भरा: ईमेलमध्ये अर्ज शुल्क भरण्यासाठी एक लिंक आणि सूचना असतील. तुमचा अर्ज पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदतीपूर्वी पैसे भरा.

LIC Recruitment 2025

⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • लेखी चाचणी आणि कागदपत्र पडताळणी साठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मनात घेतली जाणार नाही.
  • एलआयसी ने स्थापन केलेली शॉर्टलिस्टिंग समिती शॉर्टलिस्टिंग पॅरामीटर्स ठरवेल आणि त्यानंतर, एलआयसी ठरवल्याप्रमाणे पुरेशा संख्येने उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल.(LIC Recruitment 2025)
  • उमेदवारांच्या  भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही उमेदवाराची उमेदवारी नाकारण्याचा अधिकार एलआयसी राखून ठेवला आहे, जर अपात्र असल्याचे आढळले किंवा चुकीची  माहिती/प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर केली किंवा कोणतीही ‘भौतिक तथ्ये’ लपवली असतील, आणि अपात्र उमेदवारांनी भरलेले शुल्क जप्त केले जाईल.
  • जाहिरात केलेल्या रिक्त पदांची संख्या तात्पुरती आहे आणि एलआयसी ‘वास्तविक आवश्यकतांनुसार, योग्य उमेदवाराच्या उपलब्धतेनुसार’ बदलू शकते.
  • एलआयसी च्या आवश्यकतेनुसार उमेदवारांची योग्यता आणि अनुभव यावर आधारित त्यांची पात्रता विचारात घेईल. केवळ किमान पात्रता आणि अनुभव पूर्ण केल्याने मुलाखतीसाठी बोलावण्याचा उमेदवाराला कोणताही अधिकार राहणार नाही.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.

हि जाहिरात पण पहा 👇
📢इंटेलिजन्स ब्युरो (IB) सुरक्षा सहाय्यक पदासाठी भरती प्रसिद्ध | Intelligence Bureau Security Assistant Bharti 2025

हि जाहिरात तुमचे नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा

1 thought on “एलआयसी एचएफएल अप्रेंटिस भरती जाहिरात प्रसिद्ध 2025 | LIC Recruitment 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo