Krushi Utpan Bajar Samiti Bharti 2025:तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का ? कारण कृषि उत्पन्न बाजार समिती, अमळनेर जि. जळगांव यांचे आस्थापने दहावी बारावी व नुकतेच पदवीधर परीक्षा पात्र झालेल्या उमेदवारांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने उपसचिव निरीक्षक कनिष्ठ लिपिक शिपाई अशा विविध पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केलेले आहे. तुमच्याकडे जर दिलेल्या शैक्षणिक पदांसाठी पात्रता असेल तर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये तुम्ही तुमचे मजबूत करियर घडवण्यासाठी जर इच्छुक असाल तर हि जाहिरात तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. कारण कृषी उत्पन्न बाजार समिती भरती 2025 ची अधिकृत घोषणा ही नुकतीच केलेली आहे.(Krushi Utpan Bajar Samiti Bharti 2025) पात्रताधारक उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी या संधीचा नक्की फायदा करून घ्या !
Krushi Utpan Bajar Samiti Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 019
- पदाचे नाव : विविध पदांसाठी जाहिरात (मूळ जाहिरात pdf मध्ये दिलेला आहे ती वाचा.)
- शैक्षणिक पात्रता : 10 वी/ 12 वी/ पदवीधर धारक पात्र उमेदवार या भरती साठी अर्ज सादर करू शकतात.
📄पदांचा तपशील
| पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | उपसचिव | 01 |
| 2. | निरीक्षक | 01 |
| 3. | सुपरवायझर | 01 |
| 4. | कनिष्ठ लिपिक | 03 |
| 5. | अभियंता | 01 |
| 6. | शिपाई | 08 |
| 7. | पहारेकरी | 03 |
| 8. | माळी | 01 |
| TOTAL | 019 |
🗓️महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्ज सुरू : 15 ऑगस्ट 2025 पासून
- अर्जाची शेवटची तारीख : 14 सप्टेंबर 2025 पर्यंत रात्री 23:59 पर्यंत
- ऑनलाइन अर्ज शुल्क : 14 सप्टेंबर 2025 पर्यंत भरू शकता.
- ऑनलाईन (CBT)परीक्षेची तारीख : अधिकृत संकेतस्थळ कळविण्यात येईल.
- भरती विभाग : कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
- नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
- नोकरीचे ठिकाण : कृषि उत्पन्न बाजार समिती, अमळनेर जि. जळगांव (Job in Jalgaon)
(अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेरच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
- अर्ज शुल्क (Fee) : राखीव प्रवर्गाकरीता उमेदवारांसाठी ₹.400/- + 18% GST ₹. 472/- रुपये ]
अराखीव प्रवर्गाकरीता उमेदवारांसाठी ₹.600/- + 18% GST ₹.708/- रुपये ] - मासिक वेतन (Salary) : बेसिक वेतन 25,500 ते 81,100/- रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे. (मूळ जाहिरात पहा)
- वयोमर्यादा (Age Limit) : 14 सप्टेंबर 2025 रोजी
अराखीव उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे ते कमल 38 वर्ष असावे.
मागासवर्गीय गटातील उमेदवारांसाठी वयात 5 वर्षे सूट असेल.
📝निवड प्रक्रिया (Selection Process)
- पहिला टप्पा : संगणक आधारित परीक्षा (CBT)
- दुसरा टप्पा : कागदपत्र पडताळणी
Krushi Utpan Bajar Samiti Bharti 2025
📑शैक्षणिक पात्रता
- उपसचिव : शासन मान्यताप्राप्त संविधीक विद्यापिठाची कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT (कृषी पदवी प्राधान्य).
- निरीक्षक : शासन मान्यताप्राप्त संविधीक विद्यापिठाची कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT.
- सुपरवायझर : शासन मान्यताप्राप्त संविधीक विद्यापिठाची कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT.
- कनिष्ठ लिपीक : शासन मान्यताप्राप्त संविधीक विद्यापिठाची कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT, टंकलेखन (मराठी ३० प्रति / इंग्रजी प्रति ४०) सदर प्रमाणपत्र नसल्यास दोन वर्षाच्या कालावधीत सादर करता येईल.
- कनिष्ठ अभियंता : शासन मान्यताप्राप्त संविधीक विद्यापिठाची स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी असणे अनिवार्य आहे.
- शिपाई, पहारेकरी, माळी या तीन पदांसाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक
💻ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14 सप्टेंबर 2025 पर्यंत.
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| जाहिरात pdf पहा | येथे क्लिक करा |
Krushi Utpan Bajar Samiti Bharti 2025
📌उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- अर्ज करतांना उमेदावारांनी valid असलेल्या मोबाईल क्रमांक व ई-मेल आय. डी. सक्रिय असायला हवा. तसेच मोबाईल क्रमांक हा (DND Activate) नसावा संदेश वहनात येणा-या तांत्रिक अडचणीमुळे SMS /Email उमेदवार पर्यंत पोहचू शकत नाही. त्याकरीता कृषि उत्पन्न बाजार समिती, अमळनेर जबाबदार राहणार नाही.
- लेखी चाचणी आणि कागदपत्र पडताळणी साठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मनात घेतली जाणार नाही.
- उपसचिव, चिव, निरीक्षक, सुपरवायझर, कनिष्ठ लिपीक, शिपाई, पहारेकरी, आणि, माळी या पदासाठी एकुण २०० गुणांची ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल.
- उमेदवार एकापेक्षा अधिक सर्वगांसाठी अर्ज करावयाचे असल्यास अश्या प्रत्येक सवंर्गासाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल. त्यासाठी स्वतंत्र शुल्क भरणे बंधन कारक राहील.
- उमेदावाराने संपूर्ण जाहीरातीचे वाचन करुनच अर्ज भरावा. संपूर्ण भरलेला अर्ज submit केल्यानतंर त्या अर्जाची printout काढावी. सदरील अर्ज उमेदवाराने स्वतः जवळ निवड प्रक्रियेसाठी जतन करून ठेवावा. सदरील अर्ज व शैक्षणिक कागदपत्रे या कार्यालयात पोस्टाने पाठवु नयेत.
- परीक्षा शुल्क ना परतावा आहे.
- परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
- राखीव प्रवर्गातील उमेदावारांकडे अर्ज भरतांना निवड प्रक्रियेच्यावेळी नॉनक्रिमिलेयर प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) व जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने ऑनलाईन परिक्षेत मिळविलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ते नुसार विचार क्षेत्रातील उमेदवांराना कागदपत्रे पडताळणी करीता बोलविण्यात येईल त्यावेळेस उमेदवाराने ऑनलाईन अर्ज सादर करतांना जी शैक्षणिक माहिती सादर केलेली आहे. तीच कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येईल. सदर कागदपत्र पडताळणी करीता बोलविण्यात आल्यास निवड झाली असा उमेदवाराला दावा करता येणार नाही.
- उमेदावारांना ऑनलाईन परीक्षा तसेच कागदपत्र पडताळणीला स्वखर्चाने हजर राहावे लागेल.
- जाहीरातीतील कोणत्याही पदावर निवड करुन घेण्यासाठी उमेदावाराने अयोग्य मार्गाचा अवलंब केल्यास संबधित उमेदवाराला भरती प्रक्रियेतून अपात्र ठरविण्यात येईल.(Krushi Utpan Bajar Samiti Bharti 2025)
- भरती प्रक्रिये दरम्यान वेळो वेळी संकेतस्थळ पाहून भरती प्रक्रियेच्या माहिती बाबत अद्यावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.
- उमेदावारांची ऑनलाईन परीक्षा ही कोणत्याही शैक्षणिक कागदपत्रांची पूर्व तपासणी / छाननी न करता घेण्यात येणार आहे. त्यामुळे परिक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे निवडी बाबत कोणत्याही प्रकारचा हक्क राहणार नाही. किंवा त्याबाबत उमेदवाराला तक्रार करता येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- ऑनलाईन परिक्षेचे ठिकाण व दिनांक संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- जाहीरात मध्ये नमुद केलेल्या पदांच्या संख्या, आरक्षण, परीक्षा स्थगीत करणे, रद्द करणे किंवा अंशतः बदल करणे याबाबतचे सर्व अधिकार सभापती / सचिव कृषि उत्पन्न बाजार समिती, अमळनेर यांना राहतील व या संदर्भातील त्यांचा निर्णय अंतिम राहील. या बाबत उमेदवारास कोणताही दावा करता येणार नाही.
- उमेदावारांना अर्ज भरतांना तांत्रिक अडचण किंवा शंका निर्माण झाल्यास संकेतस्थळावर दिलेल्या Helpline क्रमांकावर फोन करुन मदत घ्यावी.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.
हि जाहिरात पण पहा 👇
एलआयसी एचएफएल अप्रेंटिस भरती जाहिरात प्रसिद्ध 2025 | LIC Recruitment 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा
1 thought on “कृषी उत्पन्न बाजार समिती भरती जाहिरात प्रसिद्ध | Krushi Utpan Bajar Samiti Bharti 2025”