Indian Post Payment Bank Recruitment 2025: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB) अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक व कनिष्ठ सहाय्यक नियुक्तीसाठी 2025 करिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून पदवीधरांसाठी उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे या भरती मोहीमे अंतर्गत जवळपास 309 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली असून उमेदवारांना या भरतीचे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी उमेदवारांना आवाहन केले आहे आणि त्याकरिता अंतिम दिनांक 1 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. प्रस्तुत भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि अटी IBPS च्या अधिकृत संकेतस्थळवरती प्रसिद्ध करण्यात आले आहे. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी!
Indian Post Payment Bank Recruitment 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 309 पदे
- पदाचे नाव : सहाय्यक व्यवस्थापक व कनिष्ठ सहाय्यक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्या शाखेतील पदवी असणे आवश्यक
पदांचा तपशील
| पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | सहाय्यक व्यवस्थापक | 110 |
| 2. | कनिष्ठ सहाय्यक | 199 |
| एकुण | 0309 |
- भरती विभाग : भारतीय टपाल विभागा अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात आहे.
- नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
- नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)
महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाईन अर्ज सुरू | 1 नोव्हेंबर 2025 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 1 डिसेंबर 2025 पर्यंत |
| ऑनलाईन अर्ज शुल्क | 1 डिसेंबर 2025 पर्यंत |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि भारतीय टपाल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | निवड यादी Merit List |
| दुसरा टप्पा | मुलाखत Interview |
| तिसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
- मासिक वेतन (Salary) : मासिक 30,000/- रुपये पर्यंत मिळणार आहे.
- वयोमर्यादा (Age Limit) : 1 नोव्हेंबर 2025 रोजी सर्वसाधारण उमेदवाराचे वय 20 ते 35 वर्षे दरम्यान असावे.
- अर्ज शुल्क (Fee) : सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 750/- रुपये
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 1 डिसेंबर 2025 रात्री 23:59 वाजेपर्यंत
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
Indian Post Payment Bank Recruitment 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- अपूर्ण अर्ज कोणत्याही बाबतीत नाकारला जाईल आणि पुढील कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही. याव्यतिरिक्त, कोणत्याही परिस्थितीत अर्ज सादर करण्याचे इतर कोणतेही साधन/पद्धती स्वीकारली जाणार नाही.
- उमेदवाराने ऑनलाइन भरलेल्या माहिती आणि मूळ साक्षांमध्ये कोणतीही तफावत आढळल्यास, त्याची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते.(Indian Post Payment Bank Recruitment 2025)
- उमेदवाराने दिलेली कोणतीही माहिती खोटी किंवा चुकीची किंवा पात्रता निकषांशी सुसंगत नसल्याचे आढळल्यास, त्याची/तिची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर किंवा भरती किंवा सामील झाल्यानंतर नाकारली जाऊ शकते.
- कोणतेही कारण न देता वरीलपैकी कोणतेही पद भरण्याचा किंवा न भरण्याचा किंवा अंशतः भरण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते. आवश्यक असल्यास, भरती प्रक्रिया रद्द करण्याचा/प्रतिबंधित करण्याचा/सुधारण्याचा/बदलण्याचा अधिकार आयपीपीबी राखून ठेवते.
- वरील जाहिरातीसंदर्भात कोणतेही बदल/सुधारणा/शुद्धीपत्रक केवळ आयपीपीबीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिले जाईल. म्हणून, संभाव्य अर्जदारांना या उद्देशाने आयपीपीबीच्या वेबसाइटला नियमितपणे भेट देण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
- वरील भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व पत्रव्यवहार/घोषणा आयपीपीबी वेबसाइटवरील ई-मेल/सूचनांद्वारे केल्या जातील.
- भरतीसंबंधी महत्वाची माहिती आयपीपीबी वेबसाइटवर उपलब्ध असेल आणि त्यामुळे, उमेदवारांना वारंवार भेट देण्याचा सल्ला देण्यात येत आहे. उमेदवाराने दिलेल्या अवैध/चुकीच्या ईमेल आयडीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे पाठवलेल्या ईमेल हरवल्यास आयपीपीबी जबाबदार राहणार नाही. उमेदवाराचा ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक किमान एक वर्षासाठी वैध असावा.
- या प्रतिनियुक्तीच्या जाहिराती/प्रक्रियेबाबत कोणताही वाद फक्त दिल्लीच्या अधिकारक्षेत्रातच सोडवला जाईल.
- कोणत्याही प्रश्नांसाठी कृपया careers@ipphonline.in या ईमेल आयडीवर लिहा.
- वेबसाइटवर उपलब्ध अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी कृपया तपशीलवार सूचना वाचा.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
💁♂️पंजाब नेशनल बँक अंतर्गत 750 ‘स्थानिक बँक अधिकारी’ पदांसाठी जाहिरात 2025 | Punjab National Bank LBO Bharti 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा
rupalisolanke