भारतीय नौदलात NSRY व NAY मध्ये अप्रेंटिस पदासाठी जाहिरात 2025 | Indian Navy Bharti 2025

Indian Navy Bharti 2025:भारतीय  नौदलात सामील होण्यासाठी कर्नाटकातील कारवार नेव्हल शिप रिपेअर यार्ड (NSRY) आणि गोव्यातील दाबोलीम नेव्हल एअरक्राफ्ट यार्ड (NAY) यांच्या अंतर्गत अप्रेंटिस भरती 2025 ची अधिकृत घोषणा केली आहे, या भरती मोहिमे अंतर्गत 210 उमेदवारांचे इंडीयन नेवीचा भाग बनण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे ही एक चांगली करिअरची सुरुवात करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे. या भरती मोहिमेचे उद्दिष्ट विविध तांत्रिक व्यवसायांमध्ये प्रत्यक्ष अनुभव मिळेल, पात्र उमेदवारांनी जाहिरातीत पदापुढे नमूद केलेली शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी. अर्ज हे ऑनलाईन नोंदणी करून अर्जाची प्रत्यक्ष प्रत पोस्टाने पाठवावी. त्यासाठी अंतिम दिनांक 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Indian Navy Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 210 पदे
  • पदाचे नाव : आय. टी. आय. & नॉन आय. टी. आय अप्रेंटिस(शिकाऊ उमेदवार)पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : 8वी /10वी/आय.टी.आय/डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक

पदांचा तपशील

अ. क्रं. नेव्हल ठिकाण पद संख्या
1. NSRY 180
2. NAY 030
एकुण 210
  • भरती विभाग : भारतीय नौदला अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • भरती श्रेणी : नौदलामध्ये नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : कारवार (कर्नाटक) आणि दाबोलीम (गोवा)

महत्त्वाच्या तारखा

ऑफलाईन अर्ज सुरू 18 ऑक्टोंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत
लेखी परिक्षा जानेवारी 2026 (अपेक्षित)
प्रशिक्षणाची सुरुवात 13 एप्रिल 2026 (अपेक्षित)

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि भारतीय नौदलाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा शोर्टलीस्ट
दुसरा टप्पा लेखी परिक्षा
तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
चौथा टप्पा वैद्यकीय तपासणी
  • मासिक वेतन (Salary) : उमेदवारांना दरमहा 9,600 रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 13 एप्रिल 2026 रोजी प्रशिक्षण सुरू होण्याच्या तारखेला.
    किमान वय धोकादायक नसलेल्या ट्रेडसाठी 14 वर्ष आणि धोकादायक असलेल्या ट्रेड साठी 18 वर्षे पूर्ण असावे.
  • अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रभारी अधिकारी, डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल शिप रिपेअर यार्ड, नेव्हल बेस, कारवार, कर्नाटक – 581308

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत

महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील  लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 

Indian Navy Bharti 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.(Indian Navy Bharti 2025)
  6. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  7. जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  8. कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  9. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
युको बँक अंतर्गत 532 पदांसाठी नवी भरती प्रसिद्ध 2025 | UCO Bank Recruitment 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo