IBPS RRB लिपिक भरती नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025|IBPS Clerk Recruitment 2025

IBPS Clerk Recruitment 2025:बँकिंग क्षेत्रात करियर घडवणाऱ्या उमेदवारांसाठी खूप मोठी सुवर्ण संधी चालून आलेली आहे. भारतातील इच्छुक बँकर्ससाठी एक महत्त्वाची जाहिरात आली आहे. IBPS प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी ऑफिस असिस्टंट (लिपिक) आणि ऑफिसर स्केल-I, II आणि III भरतीसाठी IBPS RRB 2025 अधिकृत जाहिरात हे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. या भरतीमुळे अंतर्गत जवळपास 13217 रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. IBPS RRB  ही प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.(IBPS Clerk Recruitment 2025) इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन मधील करिअर हे केवळ नोकरी नाही तर ती प्रतिष्ठेची आणि सुरक्षतेची बाब असल्याने, ही भरती मोहीम सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग उद्योगात स्थिर आणि फायदेशीर कारकीर्द मिळवण्याची सुवर्ण संधी आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

IBPS Clerk Recruitment 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत :  ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : 13,217 पदे
  • पदाचे नाव : ऑफिस असिस्टंट (लिपिक),ऑफिसर स्केल-I, II आणि III (मूळ जाहिरात pdf स्वरूपात वाचावी.)

शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा त्याच्या समतुल्य पदवी (मूळ जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आलेली आहे ती वाचा.)

📑पदांचा तपशील:

पद क्रं. पदाचे नाव पद संख्या
1. ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पस) 7972
2. ऑफिसर स्केल (PO) 3907
3. ऑफिसर स्केल-II(एग्रीकल्चर ऑफिसर) 050
4. ऑफिसर स्केल-II(Low) 048
5. ऑफिसर स्केल-II(CA) 069
6. ऑफिसर स्केल-II(IT) 087
7. ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) 854
8. ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) 015
9. ऑफिसर स्केल- II (ट्रेझरी मॅनेजर) 016
10 ऑफिसर स्केल- III 199
TOTAL 13217

🗓️महत्त्वाच्या तारखा :

  1. जाहिरात प्रकाशित : 31 ऑगस्ट 2025
  2. ऑनलाइन अर्ज सुरूः 01 सप्टेंबर 2025 पासून
  3. अर्जाची शेवटची तारीखः  21 सप्टेंबर 2025 पर्यंत 28 सप्टेंबर 2025
  4. शुल्क भरण्याची शेवटची तारीख (ऑनलाइन): 28 सप्टेंबर 2025 पर्यंत
  5. पूर्व परीक्षा: ऑफिस असिस्टंट (लिपिक) 6, 7, 13, 14 डिसेंबर 2025
    ऑफिसर स्केल I, II, III : 22 आणि 23 नोव्हेंबर 2025
  6. मुख्य परीक्षा: ऑफिस असिस्टंट (लिपिक) 01 1 फेब्रुवारी 2026 रोजी.
    ऑफिसर स्केल I, II, III : 28 डिसेंबर 2025 रोजी.
  • भरती विभाग : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन(IBPS)अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • भरती प्रकार : बँकिंग क्षेत्रात कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळविण्याची संधी.
  • भरती श्रेणी : गट -अ, ब, क, श्रेणीतील पदभरती

(अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

  • वयोमर्यादा (Age Limit): 01 सप्टेंबर 2025 रोजी,
    उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षा दरम्यान असावे. (मूळ जाहिरात पहा)
    [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्ष सूट ]
  • अर्ज शुल्क (Fee):  General/OBC/EWS: 850/- रुपये  [SC/ST/PwBD/ : 175/- रुपये अर्ज शुल्क राहील.]
  • मासिक वेतन (Salary ): दरमहा 35,000 ते 61,000 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
    नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत(Jon In India)

📝निवड प्रक्रिया (Selection Process)

  • पहिला टप्पा : पूर्व परीक्षा -संगणक आधारित परीक्षा(CBT)
  • दुसरा टप्पा : मुख्य परीक्षा- संगणक आधारित परीक्षा(CBT)
  • तिसरा टप्पा : कागदपत्र पडताळणी
  • चौथा टप्पा : वैद्यकीय तपासणी

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 21 सप्टेंबर 2025 पर्यंत

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
जाहिरात pdf पहा येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

IBPS Clerk Recruitment 2025

📌उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना:
  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध (Valid) ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी (Mobile No.) असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेची तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पध्दतीने देण्यात येणार असल्याने, भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • जर उमेदवारांना मोबाईल नंबर, ईमेल पत्त्यात बदल, तांत्रिक बिघाड किंवा आयबीपीएसच्या नियंत्रणाबाहेरील माहिती/सूचना पोहोचल्या नाहीत तर आयबीपीएस जबाबदार राहणार नाही आणि उमेदवारांना नवीनतम अपडेट्ससाठी अधिकृत आयबीपीएस वेबसाइट www.ibps.in वर बारकाईने लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
  • उमेदवारांची पात्रता, अर्ज स्वीकृती किंवा नाकारणे, निवडीची पद्धत आणि निवड प्रक्रिया अंशतः किंवा पूर्ण रद्द करणे इत्यादींशी संबंधित सर्व बाबींवर व्यवस्थापनाचा निर्णय अंतिम आणि सर्व उमेदवारांवर बंधनकारक असेल. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.(IBPS Clerk Recruitment 2025)
  • एकदा नोंदणी केल्यानंतर ऑनलाइन अर्ज मागे घेता येणार नाहीत आणि/किंवा एकदा भरलेले अर्ज शुल्क/सूचना शुल्क परत केले जाणार नाही किंवा इतर कोणत्याही परीक्षेसाठी राखीव ठेवले जाणार नाही.
  • कागदपत्र पडताळणी साठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मनात घेतली जाणार नाही.
  • प्रस्तुत जाहीरातीस अनुसरुन अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता / अनुभव धारण करणे आवश्यक आहे.
  • या अधिसूचनेमुळे भरती प्रक्रियेसह उद्भवणारे कोणतेही विवाद मुंबई येथील न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रात असतील.
  • कोणत्याही प्रचारामुळे किंवा अनुचित फायद्यासाठी प्रभाव निर्माण केल्याने निवड प्रक्रियेतून अपात्रता निर्माण होईल.
  • ऑनलाइन परीक्षा (प्रारंभिक, मुख्य आणि एकेरी) आणि सामायिक मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही.
  • पत्ता बदलण्याची किंवा ऑनलाइन अर्जात नमूद केलेल्या तपशीलांची कोणतीही विनंती विचारात घेतली जाणार नाही.
  • उमेदवारांच्या  भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही उमेदवाराची उमेदवारी नाकारण्याचा अधिकार IBPS राखून ठेवला आहे.अर्जामध्ये चुकीची  माहिती/प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर केली किंवा कोणतीही ‘भौतिक तथ्ये’ लपवली असतील, अपात्र असल्याचे आढळले तर भरती प्रक्रियेमधून बाद करण्यात येईल.
  • शैक्षणिक पात्रता कालावधीची गणना प्रस्तूत जाहीरातीस अनुसरुन अर्ज सादर करण्याकरीता विहित केलेल्या अंतिम दिनांकास करण्यात येईल.
  • उमेदवाराने या भरती प्रकियेसंदर्भातील माहिती व सूचना  IBPS च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द होणार असल्याने भरती प्रक्रिया पूर्ण हाईपर्यंत www.ibps.in वरील संकेतस्थळावर उमेदवारांनी सद्यस्थिती (updates) वेळोवेळी पहावी.
  • प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी पसंतीक्रम ऑनलाइन अर्जात अंतर्भूत आहे. उमेदवारांनी या टप्प्यावर त्यांचा पसंतीक्रम अनिवार्यपणे दर्शवावा. या संदर्भात बदल करण्याची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही
  • कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा प्रवास खर्च देय नाही.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील दिलेली जाहिरात pdf सविस्तर वाचवी.

IBPS Clerk Recruitment 2025

हि जाहिरात पण पहा 👇
🪀इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025|IOCL Recruitment 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा

2 thoughts on “IBPS RRB लिपिक भरती नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025|IBPS Clerk Recruitment 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo