GGMC Mumbai Bharti 2025:सरकारी नोकरीची स्वप्न बघणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग मंत्रालय, मुंबई अधिनस्त संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत रुग्णालय तसेच संस्थेतील गट ड (वर्ग-४) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यता गट-ड मधील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे सदर जाहिरातीमध्ये जवळपास 211 पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे.(GGMC Mumbai Bharti 2025) या भरतीमध्ये तुम्हाला आकर्षक पगार, तसेच असंख्य भत्ते, ही आर्थिक स्थिरता आणि रुग्ण सेवा करण्याचा मान देणारी सरकारी नोकरी मिळवण्याची संधी आहे. या साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून दि.24 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन(Online)पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
GGMC Mumbai Bharti 2025
अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
एकूण पदसंख्या : 0211
पदाचे नाव : वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध (मूळ झाला तर pdf स्वरूपात वाचावे)
शैक्षणिक पात्रता: 10 वी /12 वी /पदवीधर उमेदवार या भरती साठी अर्ज सादर करू शकतात.
पदांचा तपशील:
| अ.क्रमांक | संस्थेचे नाव | पद संख्या |
| 1. | सेन्ट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई | 99 |
| 2. | नागरी स्वास्थ केंद्र वांद्रे, मुंबई | 06 |
| 3. | परिचर्या शिक्षण संस्थ, मुंबई | 11 |
| 4. | शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई | 29 |
| 5. | आयुष, संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई | 06 |
| 6. | म.आ पोदार रुग्णालय, मुंबई | 45 |
| 7. | रा.आ. पोदार वैद्यक महाविद्यालय, (आयु), मुंबई | 15 |
| TOTAL | 0211 |
महत्त्वाच्या तारखा :
- ऑनलाइन अर्ज सुरूः 03 सप्टेंबर 25 पासून
- अर्जाची शेवटची तारीखः 23 सप्टेंबर 2025 पर्यंत संध्याकाळी 23:59 पर्यंत
- शुल्क भरण्याची शेवटची तारीख (ऑनलाइन): 23 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरायचे आहे
- ऑनलाईन (CBT)परीक्षेची तारीख :- ऑनलाइन परीक्षेची तारीख अधिकृत संकेतस्थळावरती परीक्षेच्या 10 दिवस आधी कळविण्यात येईल
GGMC Mumbai Bharti 2025
- भरती विभाग : अधिष्ठाता, ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई (महाराष्ट्र)
- भरती श्रेणी : गट-ड पदासाठी सरळसेवा मार्फत सरकारी नोकरी
- नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी (Permanent) सरकारी नोकरीची मिळवण्याची चांगली संधी.
(अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिष्ठाता, ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबईच्या अधिकृत संकेतस्थळा वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
अर्ज शुल्क (Fee) :
- अमागास प्रवर्ग उमेदवारांसाठी: 1000/- रुपये शुल्क
- मागास प्रवर्ग व अनाथ उमेदवारांसाठी: 900/- रुपये शुल्क.
[माजी सैनिक उमेदवारांसाठी शुल्क माफ राहील.] - मासिक वेतन (Salary ) : दरमहा 15,000 ते 47,600 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
वयोमर्यादा (Age Limit): 03 सप्टेंबर 2025 रोजी
पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 ते 38 वर्ष दरम्यान असावे.
सरकारी नियमांनुसार विविध श्रेणींसाठी वयात सूट देण्यात आली आहे.
[SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट, दिव्यांग : 7 वर्ष सूट, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त : 7 वर्ष सूट ]
GGMC Mumbai Bharti 2025
निवड प्रक्रिया (Selection Process) :
- पहिला टप्पा : संगणक आधारित परीक्षा (CBT)
- दुसरा टप्पा : कागदपत्र पडताळणी
नोकरीचे ठिकाण : मुंबई जिल्हा (महाराष्ट्र)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24 सप्टेंबर 2025 पर्यंत
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
GGMC Mumbai Bharti 2025
⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- उमेदवारांस मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यास मराठी लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध (Valid) ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी (Mobile No.) असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेची तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पध्दतीने देण्यात येणार असल्याने, भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणांमध्ये वाढ, घट अथवा बदल होण्याची शक्यता आहे.
- कोणत्याही कारणास्तव पदभरती प्रक्रिया स्थगित रह झाल्यास उमेदवारास परीक्षा शुल्क परत करण्यात येणार नाही.
- प्रस्तुत जाहीरातीस अनुसरुन अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता / अनुभव धारण करणे आवश्यक आहे.(GGMC Mumbai Bharti 2025)
- अनुभवाच्या कालावधीची गणना प्रस्तूत जाहीरातीस अनुसरुन अर्ज सादर करण्याकरीता विहित केलेल्या अंतिम दिनांकास करण्यात येईल.
- परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-Refundable) आहे. ऑनलाईन शुल्क भरतांना बँकेचे इतर शुल्क उमेदवाराला स्वतः भरावे लागतील.
- भरती प्रक्रियेबाबतचे सर्व अधिकार नियुक्ती प्राधिकारी यांना असून कोणत्याही टप्प्यावर भरती स्थगित किंवा रद्द करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांचेकडे राखून ठेवले आहे.(GGMC Mumbai Bharti 2025)
- उमेदवाराने या भरती प्रकियेसंदर्भातील माहिती व सूचना वैद्यकीय महाविद्यालय मुंबई यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द होणार असल्याने भरती प्रक्रिया पूर्ण हाईपर्यंत gmcjjh.edu.in व www.med-edu.in वरील संकेतस्थळावर उमेदवारांनी सद्यस्थिती (updates) वेळोवेळी पहावी.
- परीक्षेसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा प्रवास खर्च देय नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील दिलेली जाहिरात pdf सविस्तर वाचवी.
हि जाहिरात पण पहा
हि जाहिरात पण पहा 👇
📢 भारतीय हवाई दल अग्निवीर वायू भरती नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025 | Indian Air force Agniveer Vayu Requirement 2025
हि जाहिरात तुमचे नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा
Good
Nice work
Thanks
Yes