Delhi Police Constable Driver Bharti 2025 : पोलीस दलात सुरक्षित सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने बहुप्रतिक्षित एसएससी दिल्ली पोलिस कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) भरती 2025 जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उमेदवारांसाठी हि एक उत्तमसंधी आहे. या भरतीमध्ये 737 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ही भरती स्थिर आणि सन्मानाची नोकरी शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी हि एक सुवर्णसंधी आहे. यामध्ये (Pay Level 3) नुसार उत्कृष्ट पगार पॅकेज देखील प्रदान करते, ज्यामध्ये अनेक फायदे आहेत. तुम्ही जर बारावी उत्तीर्ण असाल तर या भरतीसाठी पात्र आहात, अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 ऑक्टोंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला असून, उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आलेली आहे ते वाचावी!
Delhi Police Constable Driver Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 737 पदे
- पदाचे नाव : कॉन्स्टेबल (Driver) पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळातून 12वी उत्तीर्ण ( HMV-वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.)
पदांचा तपशील
| Category | Open Vacancies | Ex-Servicemen Vacancies |
| UR | 316 | 35 |
| EWS | 066 | 07 |
| OBC | 153 | 17 |
| SC | 072 | 15 |
| ST | 047 | 09 |
| Total | 654 | 83 |
- भरती विभाग : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात आहे.
- नोकरीचा प्रकार : दिल्ली पोलीस दलात कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
- नोकरीचे ठिकाण : दिल्ली (India)
महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाईन अर्ज सुरू | 24 सप्टेंबर 2025 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 15 ऑक्टोंबर 2025 पर्यंत रात्री 11:59 पर्यंत |
| परिक्षा शुल्क अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर 2025 |
| अर्ज दुरुस्ती | 23 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2025 |
| लेखी परीक्षा/मैदान चाचणी | डिसेंबर 2025/जानेवारी 2026 |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) दिल्ली पोलीसच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | ऑनलाईन लेखी परीक्षा (CBT) |
| दुसरा टप्पा | मैदानी चाचणी (Physical Test) |
| तिसरा टप्पा | ड्रायव्हिंग टेस्ट |
| चौथा टप्पा | कागदपत्र पडताटप्पा |
| पाचवा टप्पा | वैद्यकीय तपासणी |
- मासिक वेतन (Salary) : बेसिक 21,700 ते 69,100/- रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
- वयोमर्यादा (Age Limit) : 1 जुलै 2025 रोजी
सर्वसाधारण उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे दरम्यान असावे. (दिल्ली पोलीस पाल्य वयोमर्यादा कमाल 29 वर्षे राहील) - [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, खेळाडू – 10 वर्ष सूट ]
अर्ज शुल्क
| General / OBC / EWS | 100/- रुपये |
| SC / ST / Ex-Servicemen | अर्ज शुल्क नाही |
Delhi Police Constable Driver Bharti 2025
अर्ज करण्याची पद्धत
- जर तुम्ही नवीन वापरकर्ता असाल, तर प्रथम ‘एक-वेळ नोंदणी’ (OTR) प्रक्रिया पूर्ण करा.
- नोंदणी केल्यानंतर, तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
- ‘लाईव्ह एक्झामिनेशन’ विभागाखाली ‘कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)-पुरुष दिल्ली पोलिस परीक्षा, २०२५’ साठी “अर्ज करा” लिंक शोधा.
- तुमच्या योग्य तपशीलांसह अर्ज भरा.
- ऑनलाइन अर्ज मॉड्यूल तुम्हाला तुमचा वेबकॅम किंवा फोन वापरून लाईव्ह फोटो काढण्यास सांगेल. फोटो स्पष्ट आहे आणि त्याची पार्श्वभूमी साधी आहे याची खात्री करा. टोपी किंवा चष्मा घालू नका.
- निर्दिष्ट स्वरूपात तुमची स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करा.
- अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.
- सर्व तपशील बरोबर आहेत याची खात्री करण्यासाठी तुमच्या अर्ज फॉर्मचे पूर्वावलोकन करा आणि नंतर ते सबमिट करा.
- तुमच्या रेकॉर्डसाठी तुम्ही सबमिट केलेल्या अर्ज फॉर्मची प्रत डाउनलोड करा आणि प्रिंट करा.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 ऑक्टोंबर 2025 रात्री 23:00 वाजेपर्यंत
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
Delhi Police Constable Driver Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- लेखी परिक्षा आणि मैदानी चाचणीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मनात घेतली जाणार नाही.
- उमेदवारांच्या भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही उमेदवाराची उमेदवारी नाकारण्याचा अधिकार स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) दिल्ली पोलीसने राखून ठेवला आहे, जर अपात्र असल्याचे आढळले किंवा चुकीची माहिती/प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर केली किंवा कोणतीही ‘भौतिक तथ्ये’ लपवली असतील, आणि अपात्र उमेदवारांनी भरलेले शुल्क जप्त केले जाईल.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.
हि जाहिरात पण पहा 👇
💁♂️स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) दिल्ली पोलीस दलात 7565 पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध | SSC Delhi Police Constable Recruitment 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा
Cgghbczdggc b
Satf police