Bank Of Maharashtra Requirement 2025 : बँकिंग क्षेत्रात करियर घडवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी संधी आलेली आहे बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) ने त्यांची बहुप्रतिक्षित जनरलिस्ट ऑफिसर (स्केल II) भरती 2025 जाहीरात प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये जनरलिस्ट ऑफिसर (स्केल II) तब्बल 500 रिक्त पदांसाठ अर्ज मागविण्यात येत आहेत. बँकिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या पदवीधरांसाठी ही एक महत्त्वाची सुवर्ण संधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकापैकी एक आहे. BOM मधील करिअर ही केवळ नोकरी नाही तर ती प्रतिष्ठेची आणि सुरक्षिततेची बाब आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या जनरलिस्ट ऑफिसरच्या जबाबदाऱ्यांमध्ये दैनंदिन शाखेचे कामकाज व्यवस्थापित करणे, रोख रक्कम हाताळणे, ग्राहकांशी संबंध राखणे आणि विविध बँकिंग क्रियाकलापांवर देखरेख करणे यांचा समावेश असतो. ते क्रेडिट मूल्यांकन, जोखीम मूल्यांकन आणि बँकिंग नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सुनिश्चित करण्यात देखील भूमिका बजावतात. ही भरती दोन टप्प्यात घेतली जाते: सर्वप्रथम लेखी परीक्षा घेतली जाते त्यानंतर लेखी परीक्षेमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येते.पात्रता आवश्यकता पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना बँक ऑफ महाराष्ट्राच्या bankofmaharashtra.in अधिकृत वेबसाइट, नोंदणी लिंक वापरून त्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने सबमिट करू शकतात. अर्ज करण्यासाठी दिनांक 13 ऑगस्ट 2025 पासून ते 30 ऑगस्ट 2025 या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या अविश्वसनीय संधीचा फायदा करून घ्या यशस्वीरित्या अर्ज करण्यासाठी आणि तयारी करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा हा मार्गदर्शक आणि व्यापक आढावा हा या लेखात सविस्तर दिलेला आहे. (कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आलेले आहे ती वाचावी.)
Bank of Maharashtra Requirement 2025
अं. क्रं. | श्रेणी | पद संख्या |
1. | SC | 75 |
2. | ST | 37 |
3. | OBC | 135 |
4. | EWS | 50 |
5. | UR | 203 |
TOTAL | 500 |
अर्ज स्विकारण्याची पद्धत : कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
एकूण पदसंख्या : 500 पदे
पदाचे नाव : जनरलिस्ट ऑफिसर (स्केल II)
महत्त्वाच्या तारखा :
1) ऑनलाइन अर्ज सुरूः 13 ऑगस्ट 2025 पासून
2) अर्जाची शेवटची तारीखः 30 ऑगस्ट 2025 पर्यंत
3) शुल्क भरण्याची शेवटची तारीख (ऑनलाइन): 12 सप्टेंबर 2025 पर्यंत
4) परीक्षेची तारीख अधिकृत संकेतस्थळावरती कळवण्यात येईल
अर्ज शुल्क (Fee) :
- General/OBC/EWS : 1000 [GST/-180] रुपये.
- SC/ST/PWD : 100 [ GST/- 80 ] रुपये.
मासिक वेतन (Salary ) : रूपये 64820 – 2340/1 – 67160 – 2680/10 – 93960 पर्यंत
भरती विभाग : बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra)
भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची संधी.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूप बँकिंग क्षेत्रात
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
(!अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा (Age Limit): 31 जुलै 2025 रोजी
सरकारी नियमांनुसार विविध श्रेणींसाठी वयात सूट देण्यात आली आहे.
पात्र उमेदवारांचे वय हे किमान 22 ते 35 वर्ष दरम्यान असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्ती (PwBD): (Genaral/EWS), 10 वर्षे (OBC), 13 वर्षे (SC/ST) 15 वर्ष
निवड प्रक्रिया (Selection Process) : दोन टप्प्यात होणार आहेत
•पहिला टप्पा : संगणक आधारित परीक्षा (CBT)
•दुसरा टप्पा : मुलाखत (Interview)
नोकरीचे ठिकाण : बँक ऑफ महाराष्ट्र भारतातील विविध शाखांमध्ये
ऑनाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 ऑगस्ट 2025 पर्यंत
Bank of Maharashtra Recruitment Important Link
ऑलाईन अर्ज येथे | येथे क्लिक करा |
जाहिरात pdf पहा | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :-
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- Bank Of Maharashtra Recruitment 2025
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
ही जाहिरात पण पघा👇
BHEL Artisan Recruitment 2025 : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड 515 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध 2025
हि जाहिरात तुमचे नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना शेअर करा