Arogya Vibhag Nashik Bharti 2025 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक भरती 2025 करिता “हृदयरोगतज्ज्ञ, हृदयरोग सर्जन, वरिष्ठ बालरोग सर्जन, मुख्य भौतिकशास्त्रज्ञ, ऑन्कोलॉजिस्ट, ऑन्कोलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, दंत शल्यचिकित्सक, ज्युनियर बालरोगतज्ञ” पदासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून. इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून यामध्ये विविध पदांसाठी 17 रिक्त जागांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत, पात्रताधारक उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. या भरतीचे फॉर्म भरण्यासाठी अंतिम दिनांक 15 ऑक्टोंबर 2025 पर्यंत सादर करण्यास उमेदवारांना आवाहन केले आहे. उमेदवारांची निवड हि थेट मुलाखती द्वारे होणार असून या भरती मोहिमेमध्ये कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा नाही. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी.
Arogya Vibhag Nashik Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 017 पदे
- पदाचे नाव : हृदयविकार तज्ज्ञ, हृदयविकार शस्त्रक्रिया तज्ञ, वरीष्ठ अर्भक शस्त्रक्रिया तज्ञ, मुख्य भौतिकशास्त्रवेत्ता, कर्करोग तज्ञ, कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ, इन्टेन्सिव्हीस्ट, दंतशल्य चिकित्सक, कनिष्ठ बालरोग तज्ञभरती
- शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि वेगवेगळ्या पदांनुसार देण्यात आलेली आहे.(मूळ जाहिरात वाचा)
पदांचा तपशील
| पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | हृदयविकार तज्ञ | 02 |
| 2. | हृदयविकार शस्त्रक्रिया तज्ञ | 02 |
| 3. | वरीष्ठ अर्भक शस्त्रक्रिया तज्ञ | 01 |
| 4. | मुख्य भौतिकशास्त्रवेत्ता | 01 |
| 5. | कर्करोग तज्ञ | 01 |
| 6. | कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ | 03 |
| 7. | इन्टेन्सिव्हीस्ट | 04 |
| 8. | दंतशल्य चिकित्सक | 01 |
| 9. | कनिष्ठ बालरोग तज्ञ | 02 |
| एकुण | 017 |
- भरती विभाग : सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
- नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरती
- नोकरीचे ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
महत्त्वाच्या तारखा
| अर्ज सुरू तारीख | सप्टेंबर 2025 रोजी |
| अर्जाची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर 2025 |
| मुलाखत/Interview | 15 ऑक्टोंबर 2025 रोजी 11:00 वाजता |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिकच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
- अर्ज शुल्क (Fee) : अर्ज शुल्क नाही
- वयोमर्यादा (Age Limit) : खुल्या गटातील उमेवारांसाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्षे व राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी कमाल 43 वर्षे देण्यात आलेली आहे.
- मासिक वेतन : दरमहा 30,000 ते 75,000 रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | मुलाखत (Interview) |
| दुसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
मुलाखतीचा पत्ता : वैद्यकीय अधिक्षक, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, नाशिक स्व. इंदिरा गांधी चौक, शालीमार, नाशिक 422001
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| अर्ज नमुना | येथे क्लिक करा |
Arogya Vibhag Nashik Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील दिलेल्या पत्त्यावरती दिनांक 15 ऑक्टोंबर 2025 च्या आत आलेले अर्ज ग्राह्य धरले जातील.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी व मोबाईल नंबर वैध राहणे आवश्यक राहील.
- शासकीय, निमशासकीय, खाजगी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असणा-या संबंधित अनुभवाचाच विचार निवड प्रक्रियेत करण्यात येईल. ज्या पदाकरिता अर्ज केला आहे त्याच पदाचा असलेला अनुभव ग्राहय धरण्यात येईल.
- वरिल पदे ही कंत्राटी स्वरुपाची व एकत्रित मानधन तत्वानुसार भरण्यात येणार असून सदरील नियुक्ती आदेश हे निर्गमित केलेल्या तारखेपासुन ते 11 महिने 29 दिवस पर्यंतच्या कालावधीकरिता भरण्यात येणार आहेत. पुढील पुनर्नियुक्ती आपल्या कामगिरी मुल्यांकनावर आधरित असेल.
- अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांचा सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचुक नोंदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहतील याची दक्षता घ्यावी.
- वरील नमुद पदे ही राज्य शासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत. सदर पदावर शासकीय सेवेप्रमाणे असलेले नियम अटी व शर्ती याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही तसेच यापदासाठी शासनाचे सेवानियम लागू नाहीत.
- केंद्र/राज्य शासनाने संबंधित पदे नामंजूर केल्यास उमेदवाराची सेवा कोणतीही पूर्वसूचना न देता तात्काळ समाप्त करण्यात येईल.
- अर्जदार हा संबधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदारा विरुध्द् कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.(Arogya Vibhag Nashik Bharti 2025)
- अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचेसोईनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणीकरता येणार नाही.
- अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांच्या सध्या सुरु असलेला मोबाईलनंबर व ई-मेलआयडी अचूक नोंदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्णहोईपर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी.
- भरती प्रक्रियेदरम्यान ज्या-ज्या उमेदवारांना बोलविण्यात येईल, त्या-त्या वेळी त्यांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. तसेच सदर उपस्थितीकरीता कोणतेही मानधन अथवा प्रवास खर्च देव राहणार नाही.
- अर्जाचा नमुना हा जाहिराती सोबत प्रसिध्द करण्यात आलेला असून, सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास उमेदवारांचा अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही.
- उमेदवारांचा अर्ज अपुर्ण व अर्धवट भरलेला असल्याने नाकारला गेल्यास सर्वस्वी जबाबदारी हीउमेदवारांची राहील याबाबत उमेदवारांना तक्रार करता येणार नाही
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
भारतीय सैन्य दलातम विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध | Indian Army Recruitment 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा
1 thought on “सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय अधिक्षक, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात | Arogya Vibhag Nashik Bharti 2025”