पोलीस भरती 2025 जाहीर | Maharashtra Police Bharti 2025

Maharashtra Police Bharti 2025 : महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती होण्याची स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक खूप मोठी फायदेशीर करिअर घडवण्याची सुवर्णसंधी आहे. या भरतीमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवारांसाठी मोठ्या प्रमाणात जवळपास तब्बल 15631 रिक्त पदे उपलब्ध असल्याने, उमेदवारांसाठी खूप मोठे संधी आहे महाराष्ट्र पोलीस दलाची वर्दी परिधान करण्याची आणि राज्यातील सर्वात मोठ्या पोलीस दलाचा भाग बनण्याची ही खूप मोठी  सुवर्ण संधी (Maharashtra Police Bharti Requirement) महाराष्ट्र पोलिस दलात शिपायांची सुमारे 15 हजार 631 पदे भरण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामध्ये 2024-25 च्या पोलिस शिपाई भरती प्रक्रियेस  मान्यता देण्यात आली आहे. या भरतीमध्ये 2022 व 2023 मध्ये ज्या उमेदवारांचे वयोमर्यादा संपलेली आहे अशा उमेदवारांना या भरतीमध्ये त्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे. हा एक चांगला निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेला आहे. या भरतीमध्ये पोलिस शिपाई, कारागृह शिपाई व बँड्समन संवर्गातील ही पदे भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. भरती प्रक्रिया ही त्या-त्या जिल्हा स्तरावरून राबविण्यात येते आणि  त्यासाठी सर्व प्रथम उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात येते त्यानंतर मैदानी चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलण्यात येणार आहे, लेखी परीक्षा ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.

पदांचा तपशील :

पद क्रं. पदाचे नाव पद संख्या
1. पोलीस शिपाई 12399
2. पोलीस शिपाई चालक 0234
3. सशस्त्र पोलीस शिपाई 2393
4. बँड्स मॅन 025
TOTAL 15631

एकूण पदे : 15,631 जागा.
भरती विभाग : महाराष्ट्र पोलिस विभाग द्वारे ही भरती केली जाणार आहे. भरती प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही (महाराष्ट्र राज्य गृह मंत्रालय अंतर्गत)
भरती प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.

शैक्षणिक पात्रता : उमेदवार कोणत्याही शाखेतून किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन पद्धतीने
(अधिकृत सूचना आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया महाराष्ट्र पोलीस भरती पोर्टलवर दिली जाईल, महाराष्ट्र राज्य पोलीस भरती पोर्टलनुसार. )

वयोमर्यादा:
खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा साधारणपणे 28 वर्षे असते, राखीव प्रवर्गासाठी सवलत मिळते,हे जाणून घ्या!
विशेष तरतुदी- सन 2022 व 2023 मधील पदांसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एकदाच विशेष संधी देण्यात येईल. 2024 व 2025 दरम्यान रिक्त होणारी पदेही या भरतीत समाविष्ट करण्यात येणार आहेत.

जागांचा तपशील pdf  येथे क्लिक करा 
अधिकृत संकेतसळ तेथे क्लिक करा

महत्वाची माहिती :

  • भरती प्रक्रिया जिल्ह्यानुसार प्रत्येक जिल्हास्तरावर पार पडेल.
  • लेखी परीक्षा- लेखी परीक्षा OMR शीटवर आधारित ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येईल.
  • अर्ज मागवणे, अर्ज छाननी, शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा अशा टप्प्यांनुसार प्रक्रिया होईल.
  • सर्वप्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येईल शारीरिक चाचणी ही 50 गुणांची घेण्यात येईल त्यामध्ये 24 गुण घेणे अनिवार्य राहील अन्यथा लेखी पेपर साठी अपात्र ठरविण्यात येणार
  • शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल.
  • पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत, उमेदवारांना किमान 40% गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी परीक्षा एकूण 100 गुणांची असते आणि त्यात 100 प्रश्न विचारले जातात.
  • संपूर्ण प्रक्रियेचे नियोजन व अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण व विशेष विभागांना पोलिस महासंचालकांची मंजुरी असेल.

Leave a Comment